Credit Card Rule Change: क्रेडिट कार्डबाबत RBIने घेतलाय नवीन निर्णय; तुमच्यावर काय होणार परिणाम?

Credit Card Rule Change: देशातील सर्वोच्य बँकने म्हणजेच RBI ने देशातील ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी जारी केली आहे. ही बातमी ग्राहकांच्या फायद्याची आहे, कारण नवीन नियमांप्रमाणे आता ग्राहकांना कोणत्या नेटवर्कवर क्रेडिट कार्ड घ्यायचंय ते स्वतः ठरवता येणार आहे. याचा अर्थ RuPay, Visa, Mastercard किंवा Amex यापैकी एखादं नेटवर्क तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता. RBI ने बुधवारी हा निर्णय घेतला असून सप्टेंबरच्या 6 तारखेपासून तो लागू होणार आहे.

काय आहेत सर्वोच्य बँकचा नवीन नियम? (Credit Card Rule Change)

रिझर्व्ह बँकच्या नवीन नियमांनुसार आता तुमच्या क्रेडिट कार्डाचं नेटवर्क बदलणं सोपं होणार आहे, कारण याच नियमावलीनुसार 10 लाख पेक्षा जास्ती कार्ड्स जारी करणाऱ्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांना कार्ड रिन्यू करताना नवीन नेटवर्क (Visa, MasterCard, RuPay) निवडण्याचा पर्याय दिला जाईल. म्हणजेच, तुमच्याकडे आधीपासून असलेलं कार्ड जर या बँकांमधलं असेल तर पुढच्या renewal च्या वेळी तुम्ही तुमच्या सोयीस्कर असलेलं नेटवर्क निवडू शकता. या नवीन निर्णयानुसार आता ग्राहकांच्या कलाकलाने घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि यामध्ये बँका त्यांना रोख लावू शकणार नाहीत.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) क्रेडिट कार्डाबाबत नवा नियम जारी केला आहे. या नियमानुसार, बँका आणि इतर आर्थिक संस्था (Non-Banking Financial Institutions) कोणत्या कार्ड नेटवर्कशी जोडल्या आहेत, त्यावरूनच त्यांना मिळणाऱ्या फायद्यानुसार त्या ग्राहकांना कार्ड जारी करतील(Credit Card Rule Change), म्हणजेच आता तुमच्या बँकेकडे कोणत्या कार्ड नेटवर्कशी (RuPay, Visa, MasterCard इत्यादी) करार आहे, त्यावर तुमच्या हाती येणाऱ्या कार्डाचं नेटवर्क अवलंबून असेल.