Credit Card : आपल्यातील अनेक लोकं क्रेडीट कार्डचा वापर अगदी न चुकता करतात, पण केवळ बिल भरण्यासाठी. त्या क्रेडीट कार्ड सोबत येणाऱ्या बाकी सुविधांचा वापर करण आपल्या लक्ष्यातच राहत नाही. त्यामुळे क्रेडीट कार्डचा वापर करत असताना त्याच्या सुविधांचा वापर करावा हे माहिती असणं महत्वाचं आहे. आज जाणून घेऊया याच विषयाबद्दल अगदी थोडक्यात पण महत्वाचं.
१) कार्डचे बिल वेळेत भरा:
क्रेडीट कार्डचे बिल वेळेत भरल्याने तुमचा क्रेडीट स्कोर चांगला राहायला मदत होते.दर महिन्याला कार्ड वरून उशिरा पेमेंट करणे थांबवा.
२) योग्य क्रेडीट कार्ड निवडा: (Credit Card)
जर का तुम्हाला क्रेडीट कार्ड वर मिळणाऱ्या सुविधांचा वापर करायचा असेल तर त्यासाठी हातात योग्य क्रेडीट कार्ड असणं गरजेचं आहे. क्रेडीट कार्डची निवड करताना त्यावर मिळणारे डिस्काऊट, कॅशबेक, बक्षिसं यांची पाहणी करा. तुम्ही कश्या प्रकारचे आयुष जगता त्या नुसार क्रेडीट कार्ड निवडा, जर का तुम्हाला फिरायची आवड असेल तर भटकंतीवर भरपूर सूट देणारे कार्ड निवडा.
३) कार्डवर मिळणाऱ्या ऑफर्सचा फायदा करवून घ्या:
प्रत्येक कार्डवर या न त्या प्रकारच्या काही ऑफर्स नक्कीच उपलब्ध असतात. ज्यात डिस्काऊट, गिफ्ट वोचर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात. यांना ओळखून त्याचा वापर करा.
४) EMI चा वापर सुरु करा:
जर का तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूची किंमत फारच अधिक असेल तर त्यावेळी EMI चा वापर करून दर महिन्याला अमुक एक रक्कम भरून टाका, यामुळे काय होईल तर तुमच्या आर्थिक नियोजनावर जोर पडणार नाही.
५) आपण किती खर्च केला याची नोंद करा:
अनेकवेळा मोबाईलचा वापर करून आपण झटपट पैसे देत असतो आणि नेमके किती आणि कुठे पैसे दिले गेलेत याची नोंद राहत नाही. अश्यावेळी काय कराल तर एका मोबाईल एपचा वापर करून क्रेडीट कार्डवरून (Credit Card) होणाऱ्या खर्चाची नोंद ठेवा. तुमची पेमेंट हिस्ट्री जर का चांगली असेल तर क्रेडीट कार्डच्या अधिकाऱ्याकडे चर्चा करून वार्षिक हप्त आणि लागू होणाऱ्या इंटरस्टची चौकशी करा.