Credit Card Use Tips : Credit Card चा वापरत करताय? मग ‘या’ गोष्टी माहिती करून घ्याच

Credit Card Use Tips : आपल्यापैकी अनेक मंडळी क्रेडिट कार्डचा वापर करत असतीलच. तंत्रज्ञानाच्या या जगात दिवसेंदिवस आथिर्क व्यवहार करण्याच्या प्रक्रिया सुधारत असल्या तरीही क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात करतात. महिलावर्गाकडून विशेषतः क्रेडिट कार्डचा वापर खरेदीसाठी केला जातो. बँक कडून जारी करण्यात आलेले हे क्रेडिट कार्ड निश्चित खर्चाच्या बंधनासह वापरले जाते. मात्र लक्ष्यात असुद्या कि तुमच्या क्रेडिट कार्डच्या वापराचा परिणाम थेट सिबिल स्कोरवर दिसून येतो म्हणूनच क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी कायम लक्ष्यात ठेवणे महत्वाचे आहे. क्रेडिट कार्ड हे अनेक अंगांनी फायदेशीर असले तरीही काही चुका तुम्हाला कायमचा मनस्ताप देऊ शकतात, त्यामुळे आज जाणून घेऊया बहुउपयोगी क्रेडिट कार्डचा वापर नेमका करावा तरी कसा…

क्रेडिट कार्ड आहे यूजर फ्रेन्डली:

क्रेडिट कार्डचा वापर वरती नमूद केल्याप्रमाणे भरपूर आहे पण तो योग्य पद्धतीने करणे महत्वाचे असते. क्रेडिट कार्डचा वापर करताना तुम्हाला काही मर्यादित रकमेचा वापर करता येतो म्हणजेच काय तर वापरकर्ताच्या डोक्यावर हे एका प्रकारचे कर्जच आहे. क्रेडिट कार्डवर व्याज देखील प्रचंड दरांत आकारले जाते म्हणून याचा वापर करताना योग्य पद्धतींचा अवलंब करणे महत्वाचे आहे. या बदलत्या जगात तुम्ही जेवढ्या स्मार्टली गोष्टी हाताळाल तेवढाच वेळ वाचेल आणि पटापट गोष्टी पूर्ण होतील (Credit Card Use Tips). असे न केल्यास अनेक प्रसंगांमध्ये तोटा सहन करावा लागू शकतो. तरुण पिढीला तुम्ही हार्डवर्क नाही तर स्मार्टवर्क करताना नक्कीच पाहिलं असेल, मात्र हे स्मार्टवर्क काळजीपूर्वक करता आले पाहिजे.

क्रेडिट कार्डच्या बाबतीत या गोष्टी लक्ष्यात ठेवा: (Credit Card Use Tips)

क्रेडिट कार्डच्या वापरावर नेहमीच एक मर्यादा दिली जाते, आणि स्मार्ट वापरकर्त्याने कधीही या मर्यादेचा पूर्ण वापर करू नये. दिलेल्या मर्यादेच्या केवळ ३० टक्क्यांपर्यंत वापर करणे तुमच्या फायद्याचे ठरेल. बँक कडून एखादवेळेस सवलत देऊ केली म्हणून क्रेडिट कार्डचा हात सोडून वापर करू नका, वापराच्या मर्यादेकडे केलेले दुर्लक्ष्य तुमचे मोठे नुकसान करू शकते. क्रेडिट कार्डच्या वापरकर्त्यांना ठरलेल्या दिवशी बिलाची रक्कम भरावी लागते, हि मदत कधीच चुकवू नका नाहीतर यावर मोठा दंड भरावा लागू शकतो व सामान्य जनतेला आर्थिक फटका बसतो. तसेच हे बिल भरताना कधीच EMIची निवड करू नका, EMIची निवड केल्यास तुम्हाला दर महिन्याला व्याजासह रक्कम परत करावी लागेल.

क्रेडिट कार्डचा वापर करून केलेली खरेदी हि कर्ज काढून केलेल्या खरेदीच्या सामानच असते. सुशिक्षित नागरिक म्हणून नेहमीच वापरकर्त्यांना संबंधित कार्डच्या नियम व अटींबद्दल सविस्तर माहिती असणे अनिवार्य आहे, कारण एखादवेळी संकटांचा सामना करावा लागला तर तुम्ही थेट न्यायालयामध्ये जात घोटाळ्यासंबंधित दाद मागू शकता. क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या सवलतींकडे पाहत भरमसाठ खरेदी करू नये कारण पुढे याचा परिणाम तुम्हाला दर महिन्याला भोगावा लागू शकतो. वरती नमूद केलेल्या टिप्स (Credit Card Use Tips) अगदीच हलक्या वाटत असल्या तरीही प्रत्येक वापरकर्त्याने या सर्व गोष्टी कायम लक्ष्यात ठेवल्या पाहिजेत, कारण यांचा वापर करूनच तुम्ही आर्थिक त्रासांना कोसो मैल दूर ठेऊ शकता.