Credit Card Use : तुम्हीही Credit Card चा वापर करता? मग या गोष्टी लक्षात ठेवाच

Credit Card Use । आपल्यातील अनेकजण क्रेडीट कार्डचा वापर करतात. या नवीन सुविधांमुळे काय होतं तर हातात पैसे घेऊन फिरण्याची गरज असत नाही आणि म्हणूनच दिवसेंदिवस क्रेडीट कार्ड आणि इतर आधुनिक गोष्टींचा वापर वाढलेला आहे. असं म्हणतात कि जेवढा जास्त वापर तेवढा जास्ती धोका. त्यामुळे क्रेडीट कार्ड वापराच्या बाबतीत लागू होणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागणार नाही (Credit Card Use).

१) तुमचे क्रेडीट कार्ड कुणालाही देऊ नका: Credit Card Use

मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत असलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कुणाच्याही हाती लागू न देणे. क्रेडीट कार्ड हि देखील मौल्यवान वस्तूंपैकी एक असल्यामुळे ती सहजासहजी कुणाच्या हाती देऊ नका, तुमच्या खरोखर विश्वासू माणसांशिवाय कुणावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.

२) क्रेडीट कार्डचा पिन बदला:

पिन ठेवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आकडा जमेल तेवढा कठीण असावा. शक्यतो तुमची जन्म तारीख किंवा अगदी सोप्या तऱ्हेने लक्ष्यात येईल असा पिन ठेऊ नका. आणि समाविष्ट केलेला पिन वेळोवेळी बदलत राहा. शक्यतो दर सहा महिन्यांमध्ये हा पिन बदलला गेला पाहिजे. तसेच हा नंबर कुणासोबत शेअर करू नका.

3) अनधिकृत वेबसाईटवर क्रेडीट कार्ड वापरू नका:

इंटरनेटवर सध्या अनधिकृत वेबसाईटसचा बोलबाला वाढला आहे. आणि यांचा वापर चोर आणि गुन्हेगार पैसे लुबाडण्यासाठी करतात, त्यामुळे अश्या माहिती नसलेल्या वेबसाईटपासून दूर राहा. अनेकवेळा कमी पैश्यांत उपलब्ध होणाऱ्या वस्तूंकडे आपण आकर्षित होतो पण कायम लक्ष्यात असुद्या कि एक छोटी गोष्ट खूप मोठे नुकसान करवू शकते (Credit Card Use).

4) दर महिन्यात स्टेटमेंट तपासा:

दर महिन्यात क्रेडीट कार्डचे स्टेटमेंट तपासणे महत्वाचे आहे, यामुळे तुम्ही नेमका खर्च कुठे करत आहात आणि कुठे बचत करण्याची गरज आहे याची माहिती मिळते. या सोबतच इतर कुणी तुमचे कार्डवरून पैसे वापरत नाहीये ना याचा अंदाज येईल आणि वेळीच सावध राहायला मदत मिळेल.