Credit Card : दिवाळीत खरेदी करताना क्रेडीट कार्ड वापरताय; या गोष्टी जाणून घ्या….

Credit Card : दिवाळी आता काही दिवसच दूर आहे, एव्हाना तुम्ही काय खरेदी करायची आहे, त्यासाठी किती पैश्यांची गरज लागेल इत्यादी यादी तयार केलीच असेल. पण जर का या खरेदीसाठी तुम्ही क्रेडीट कार्ड चा वापर करणार असाल तर आम्ही काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. लक्ष्यात घ्या क्रेडीट कार्डवर अनेक प्रकारचे टॅक्स लावले जातात, आणि सण म्हटला कि खर्च हा होतोच त्यामुळे आज जाणून घेऊया कि या टॅक्स पासून सावध राहत कश्याप्रकारे पैसे वाचवता येईल हे पाहूयात…

१) GST:

GTS हा टेक्स सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवावांवर आकारला जातो. ती वस्तू नेमकी कशी आहे, यानुसार त्यावर लागणारी GST ची किंमत बदलत जाते. क्रेडीट कार्डचा वापर करताना हिची किंमत तपासून पहा, साधारणतः GTS ची किंमत 5% ते 28%च्या मध्ये असते, तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूची किंमत आणि GST यांचा गुणाकार करा ज्यामधून यावर लागू झालेल्या किमतीचा अंदाज येईल.

२) Interest Charges: Credit Card

क्रेडीट कार्ड वापरावर लागणारा हा अजून एका प्रकारचा टॅक्स आहे. तुम्ही क्रेडीट कार्डचा वापर नेमका कसा आणि किती खर्च करण्यासाठी करता यानुसार त्यावर लागणारा व्याज दर ठरत असतो. आणि जर का तुम्हाला जास्तीत जास्त व्याज भरावा लागत असेल तर याचा अर्थ तुमचा खर्च जास्ती होत आहे असा होतो. मग काय कराल तर बिलिंग सायकल सुरु होण्यापूर्वीच क्रेडीट कार्डची रक्कम तपासा, क्रेडीट कार्डवर लागणारा APR वार्षिक असतो, याच APR ला 12 ने भाग दिल्यास तुम्हाला प्रती महिना किती व्याज भरावा लागतोय याचा अंदाज येईल.

या व्यतिरिक्त काय कराल तर तुम्हाला नेमकी किती खरेदी करायची आहे याची नीट यादी बनवा, त्यावर किती टक्के GST लागू शकतो याचा अंदाज घ्या. तुम्हाला खर्चाच्या बाबतीत अंदाज येत नसेल तर एखाद्या चांगल्या टॅक्स सल्लागाराची मदत घ्या. क्रेडीट कार्डवर (Credit Card) जरी बक्षिसं मिळत असली तरीही त्यावर लागणाऱ्या टॅक्सचा अंदाज घ्या आणि या बाबतीत तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न अधिकाऱ्याशी चर्चा करा.