बिझनेसनामा ऑनलाईन । दिवसेंदिवस आपला Online Payment चा वापर वाढत चालला आहे. तसेच हा वापर लक्षात घेत यासंदर्भात नवनवीन बदल केले जात आहे. Technology चा वापर करत जगणं सोपं करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आधी केवळ मोबाईल इंटरनेटचा वापर करत Online Payment करता यायचं, जे की बदलत आता Offline पद्धतीने सुद्धा पेमेंट करता येईल. मात्र Technology दिवसेंदिवस बदलत असते. त्यानुसार आता तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे नसतानाही UPI Payment चा वापर करता येईल. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये UPI वर क्रेडिट लाइनची सुविधा (Credit Line On UPI) जाहीर केली
काय आहे Credit Line UPI Payment : Credit Line On UPI
NPCI ने ग्लोबल फिन्टेक फेस्ट मध्ये Credit Line On UPI ची घोषणा केली. सध्यातरी ही योजना फारच थोड्या बँकांमध्ये व UPI Apps वर उपलब्ध आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने हल्लीच प्री सेंकशन क्रेडीट लाईनला UPI सिस्टम मध्ये सामील करण्याची घोषणा केली आहे. सध्या सेव्हिंग अकाउंट, प्रीपेड वोलेट, रूपे क्रेडीट कार्ड यांना UPI System शी जोडण्याची शक्यता आहे.
UPI ची सुरुवात कधी झाली व काय बदल होत गेले?
वर्ष 2016 मध्ये UPI payments ची सुरुवात झाली. UPI ची सारी जबाबदारी नेशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था सांभाळते. UPI मुळे जगणं खूपच सोपं झालेलं आहे. इथे तुम्हाला एखाद्याला भेटून पैसे देण्याची गरज नाही. केवळ मोबाईल नंबरच्या मदतीने किंवा UPI च्या मदतीने तुम्ही पैसे ट्रान्स्फर करू शकता. भारतात UPI वापरणार्यांची संख्या वाढत आहे, आत्ता हा आकडा 10 billion च्या पुढे पोहोचला आहे.