Credit Score म्हणजे काय? तो सुधारण्यासाठी नेमकं काय करावं ?

Credit Score : क्रेडीट स्कोरबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, याला सिबिल स्कोर असेही म्हटलं जातं. हा तीन अंकी आकडा तुमच्या आर्थिक व्यवहाराबदल माहिती देण्याचं काम करतो. Credit Score ची एक पातळी कायम ठेवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. तुमचा क्रेडीट स्कोर जर का चांगला असेल तर बँका तुम्हाला कर्ज द्यायला मागे पुढे बघणार नाहीत. बँका किंवा आर्थिक संस्थांचा तुमच्यावर विश्वास बसेल कि तुम्ही वेळेत लोनची परतफेड करू शकता. हाच क्रेडीट स्कोर महत्वाचा का आहे आणि त्याची पातळी नेमकी कशी व्यवस्थित ठेवावी याबद्दल जाणून घेऊया..

क्रेडीट स्कोर महत्वाचा आहे का? (Credit Score)

क्रेडीट स्कोर किंवा सिबिल स्कोर हा तुमचे आर्थिक व्यवहार कोणत्याही अडथळ्यांशिवाय चालू राहण्यासाठी महत्वाचा आहे. बँका किंवा आर्थिक संस्था लोन देण्याआधी तुमचा क्रेडीट स्कोर तपासून पाहतात. लोनची परतफेड करताना जर का उशीर झाला किंवा तुम्ही ती रक्कम परत केली नसेल तर तुमचा क्रेडीट स्कोर नेगेटिव्ह होतो. Credit Score नेगेटिव्ह होण्याचं हे एक कारण म्हटलं तरीही यांसारखी अनेक कारणं आहेत. जर का तुमचा क्रेडीट स्कोर 750 ते 900 च्या मध्ये असेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुमचे गुण चांगले आहेत. पण जर का हाच आकडा 600 पेक्षा कमी असेल तर मात्र तुम्ही क्रेडीट स्कोर सुधारण्याची गरज आहे.

क्रेडीट स्कोर कसा सुधारावा?

१) बिलं वेळेत भरा:

क्रेडीट स्कोर सुधारण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमची बिलं वेळेत भरा. यात तुमचं लाईट बिल, फोन बिल,घराचं बिल इत्यादींचा समावेश होतो. वेळेत जर का हि बिलं भरली गेली नाहीत तर लगेचच तुमच्या क्रेडीट स्कोर वर 80 ते 100 अंकांची कपात होईल.

२) घेतलेली रक्कम परत करा:

तुम्ही जर का कुठल्याही बँक किंवा आर्थिक संस्थेकडून कर्ज घेत असाल तर व्याजासहित त्याची रक्कम वेळेत परत करा. कारण तसं केलं नाही तुमच्या क्रेडीट स्कोरवर त्याचा परिणाम दिसून येईल आणि पुढच्यावेळी सहजासहजी कर्ज मिळणार नाही.

३) वेळोवेळी क्रेडीट स्कोर तपासा:

वेळोवेळी Credit Score ची तपासणी करत राहणं महत्वाचं आहे. यामुळे काय होईल तर नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे तुमच्या Credit Score वर परिणाम होत आहे हे दिसून येईल आणि त्या चुका तुम्ही नंतर सुधारू शकता. www.cibil.com या साईट वर जाऊन सीबील स्कोर सहजपणे तपासता येतो.

४) एकाच क्रेडीट कार्डचा वापर करा:

शक्यतो अनेक क्रेडीट कार्ड्सचा वापर करणे टाळा. तुम्हाला नवीन कर्ज देताना आर्थिक संस्था किंवा बँका हाच क्रेडीट स्कोर तपासून बघत असतात. आणि जास्तीत जास्त क्रेडीट कार्डची केलेली चौकशी तुमच्या सिबिल स्कोरची पातळी घसरवू शकते. त्यामुळे वेळेचं बंधन पळून आणि नियोजन करून या क्रेडीट कार्ड्सचा वापर करा.