Credit Utilization Ratio म्हणजे काय? तो कसा Calculate करतात?

बिझनेसनामा ऑनलाईन । जर तुम्ही बँकेतून कर्ज घेत असाल तर तुम्ही क्रेडिट स्कोर हे ऐकलं असेल. हा क्रेडिट स्कोर म्हणजे कर्जाची परतफेड करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता मोजण्यासाठीचं एक पॅरामीटर आहे. तुमचा क्रेडिट स्कोर खराब असल्यास कर्ज मिळण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. पण जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तर कमी व्याजदरामध्ये तुम्हाला कर्ज मिळू शकते. जेव्हा फायनान्स मॅनेज करण्याची वेळ येते तेव्हा क्रेडिट युटीलायझेशन रेशो समजून घेण्याची गरज असते. हा रेशो म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूया

क्रेडिट युटीलायझेशन रेशो (CUR) म्हणजेच तुमच्या क्रेडिट कार्डची क्रेडिट मर्यादा एका महिन्यासाठी किती वापरात येते. त्याचबरोबर तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहे हे देखील या मध्ये मोजले जाते. 30 टक्क्यांपर्यंतचा क्रेडिट रेशो ठीक मानला जातो, परंतु त्याच्या वर गेल्यास तुमच्या सिबिल स्कोरवर त्याचा उलट परिणाम होतो.

अगदी सोप्या पद्धतीत सांगायचं म्हणजे, समजा जर तुमच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डवर दोन लाख रुपये क्रेडिट लिमिट आहे, तर त्यातील 30 हजार रुपये तुम्ही खर्च केले, तर तुमचा क्रेडिट युटीलायझेशन रेशो हा पंधरा टक्के असेल. म्हणजे जर क्रेडिट लिमिट जास्त वापरली गेली तर तुमचा क्रेडिट युटीलायझेशन रेशो देखील वाढतो. चांगल्या सिबिल स्कोर साठी क्रेडिट युटीलायझेशन रेशो हा तीस टक्के पेक्षा कमी ठेवायला हवा. म्हणजेच जर CUR 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला तर क्रेडिट स्कोर कमी होतो. जर तुम्ही कमी CUR ठेवला तर क्रेडिट लिमिट वाढवण्याचा सल्ला दिला जातो.

जर तुम्ही तुमचा क्रेडिट युटीलायझेशन रेशो कॅल्क्युलेट करत असाल तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

  1. तुमच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स तुम्हाला दयावे लागतील.
  2. तुमच्या क्रेडिट कार्डचे अपडेटेड डिटेल्स जोडा
  3. तुमच्या क्रेडिट कार्डमधील एकूण शिल्लक रक्कम निवडा
  4. तुमच्या क्रेडिट कार्ड मधील थक बाकी रक्कम जोडा
  5. तुमच्या क्रेडिट कार्ड ची लिमिट ठरवा
  6. तुमच्याकडे असलेल्या सर्व क्रेडिट कार्डची लिमिट ठरवा
  7. तुमच्या क्रेडिट युटीलायझेशन रेशो कॅल्क्युलेट करा
  8. हा रेशो कॅल्कुलेट करण्यासाठी क्रेडिट कार्ड मधील बॅलन्सला क्रेडिट लिमिटने डिव्हाईड करा. त्यानंतर टक्केवारी काढून 100 ने गुणाकार करा.
  9. समजा तुमच्या क्रेडिट कार्ड मध्ये 2,000 रुपये बॅलन्स आहे. आणि तुमची क्रेडिट लिमिट 10,000 एवढी आहे. तर क्रेडिट युटीलायझेशन रेशो (2,000/10,000)*100 म्हणजेच 20 टक्के एवढा होईल.