बिझनेसनामा ऑनलाईन । भारतात क्रिकेटचं वेड फार आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण क्रिकेटचे चाहते आहेत. त्यामुळे आपल्या देशात क्रिकेटला धर्म मानला जातो. मागच्या २ -३ दिवसांपूर्वी आशिया चषक जिंकून भारतीय क्रिकेट संघाने आपल्या गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणीत केला. यानंतर नजरा लागून आहेत त्या विश्वचषकावर. पुढच्या महिन्यात क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (Cricket World Cup 2023) होणार असून आनंदाची बाब म्हणजे भारताला यजमानपद मिळालं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान, TV आणि Digital प्लॅटफॉर्मवर एकत्रित जाहिरातींच्या कमाईतून तब्बल 2,000 कोटी रुपये कमाई होण्याची अपेक्षा आहे.
तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा एकदा भारताकडे विश्वचषकाचे (Cricket World Cup 2023) यजमानपद आलं आहे. यंदाच्या विश्वचषकात एकूण 10 संघांचा समावेश आहे, ज्यांच्यामध्ये 48 सामने खेळले जातील. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत हे सामने खेळवण्यात येणार असून अहमदाबादमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये पहिली लढत पाहायला मिळेल. देशातील 10 मैदानावर विश्वचषकाचे सर्व सामने होणार आहेत.
ad Revenue मधून होणार करोडोंची कमाई: Cricket World Cup 2023
या विश्वचषक स्पर्धेवेळी जाहिरातीमधून जमा होणार पैसा करोडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. TV आणि Digital Platforms एकत्र केल्यास हा आकडा 2,000 ते 2,200 कोटी रुपये होऊ शकतो. वर्ष 2019, म्हणजेच चार वर्षांआधी ad revenue हा केवळ 1,350 कोटी रुपये होता व यंदाच्या वर्षी त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एलारा केपिटल ( Elara Capital) या ब्रोकरेज फिर्मच्या म्हणण्यानुसार 2019 पेक्षा यंदाच्या वर्षी मिळणारा ad revenue हा जास्ती असणार आहे. Tv कडून मिळणारा ad revenue 1,150 कोटी तर online platforms कडून 950 कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
Ad Revenue वाढण्याचे प्रमुख कारण सामने सुरु होण्याची वेळ आहे असे वक्तव्य एलारा कॅपिटल्सचे सिनिअर वाइस प्रेसिडेंट करण तौरानी यांनी केले. विश्वचषक स्पर्धेचे (Cricket World Cup 2023) सर्व सामने सकाळी 10:किंवा दुपारी ते 2:00 वाजता असल्यामुळे हि वेळ क्रिकेट प्रेमींसाठी सोयीस्कर ठरणार आहे. या वेळी OTT वरुन अधिकाधिक पैसा मिळण्याची शक्यता आहे. Tv adचा CAGR 6% तर डिजिटल मिडीयमचा CAGR 21% होऊ शकतो असंही ते पुढे म्हणाले.
Disney+Hotstar चे Free Streaming:
2023 पर्यंत Disney+Hotstar कडे ICC TV आणि डिजिटल मिडियाचे राय्टस असणार आहेत. त्यांच्याकडून विश्व चषकाचे Cricket World Cup 2023) सर्व सामने फ्री मध्ये दाखवले जाणार आहेत. तर दुसरीकडे Jio सिनेमावरही वल्डकपचे सामने फ्री मध्ये दाखवले जाणार आहेत. त्यामुळेही जाहिरातीत मिळणाऱ्या पैशामध्ये वाढ होण्यास बळ मिळणार आहे.