बिझनेसनामा ऑनलाईन । जगभरात सध्या एकाच गोष्टीची आतुरतेने वाट पहिली जात आहे आणि ती म्हणजे क्रिकेट विश्वकप 2023 (Cricket World Cup 2023). ४ वर्षातून एकदा भरवण्यात येणाऱ्या या स्पर्धचे यंदाचं यजमानपद भारताजवळ आहे त्यामुळे मागच्या ४ दिवसांत परदेशातून आलेल्या खेळाडूंचे इथे दमदार स्वागत करण्यात आलं. क्रिकेट हा खेळ भारतात एखाद्य धर्माप्रमाणे मानला जातो, त्यामुळे वर्ल्डकपचे यजमानपद भूषवत असताना भारताला भला मोठा आर्थिक फायदाही होणार आहे. यात प्रामुख्याने advertismentsचा समावेश असला तरी एअरपोर्ट, हॉटेल, रेस्टोरंट असणाऱ्यांची मोठी चांदी होणार आहे.
Cricket World Cup 2023 मुळे कोणाला होणार फायदा-
5 ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यामुळे केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरतील लोकांची उत्कंठा ताणलेली आहे. भारत पहिल्यांदाच विश्वकपाची जबाबदारी एकट्याने पेलवणार आहे. यादरम्यान मालामाल होणाऱ्या व्यवसायांमध्ये हॉटेल्स, एअरलयन, रेस्टोरन्टस,आणि ट्रेव्हल कंपन्यांचा समावेश होतो. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. देशात सुरु होणाऱ्या विश्वचषकामुळे (Cricket World Cup 2023) या सर्व गोष्टींची मागणी वाढणं साहजिक आहे. देश विदेशातील अनेक लोकं, खेळाडू प्रवास करणार आहेत, त्यामुळे त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय हॉटेल्स मध्ये केली जाणार आहे.
G20 पासूनच आला होता मागणीला जोर-
गेल्याच महिन्यात विश्वातील 20 देशांची बैठक भारतात झाली. ज्याचे यजमानपद देखील भारताजवळ होते. तेव्हापासूनच देशातील या क्षेत्रांमध्ये लोकांची ये जा वाढली होती. तसेच गुंतवणूकदारांना यातून भरपूर फायदा झाला होता. आता पुन्हा एकदा लोकांची वर्दळ वाढल्यामुळे पुन्हा एकदा या कंपन्यांच्या मालकांना फायदा होणार आहे, तसेच गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ताज हॉटेल्स, वेस्टलायफ फूड वल्ड, जुबिलंट फूडवर्क्स इत्यादींच्या शेअर्समध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. प्रवासी विभागाबद्दल बोलायचं झाल्यास इंडिगो आणि IRCTC यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवावं लागणार आहे. लोकांची ये जा कायम वाढणार असल्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या कमाईमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील