Cricket World Cup : क्रिकेटमधील गुंतवणूक देशाच्या फायद्याची की तोट्याची? काय म्हणतात तज्ज्ञ

Cricket World Cup : नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव केला आणि भारतीय चाहत्यांचे स्वप्न तुटलं. सलग दहा सामने जिंकून सुद्धा अंतिम टप्प्यात भारताला पराभवाचा सामना करावा करावा लागला. यानंतर असंख्य क्रिकेट प्रेमींचा स्वप्न क्षणार्धात तुटून गेलं. पण हा विश्वचषक भारतीय संघासाठी फारच महत्त्वाचं ठरलेलं आहे कारण संपूर्ण विश्वचषकाची स्पर्धा भारतीय संघाने आपल्या मजबूत पकडीत धरून ठेवली होती, आणि म्हणूनच त्यांच्य उत्कृष्ट कामगिरीमुळे आजही सर्व चाहत्यांचा त्यांच्यावर विश्वास कायम आहे. मात्र काही लोकांमध्ये अशाही चर्चा ऐकायला मिळतात की विश्वचषकामध्ये पराभूत झालेल्या भारतीय संघाच्या मानधनावर याचा विपरीत परिणाम होणार आहे आणि क्रिकेटमध्ये केलेली पैशांची केलेली गुंतवणूक हे एका अर्थाने आपल्याला आर्थिक नुकसानच म्हणावं लागत आहे. पण तथ्य नेमकं काय आहे हे आज जाणून घेऊया…

क्रिकेटचा सामना आपल्यासाठी फायद्याचा की नुकसानीचा? (Cricket World Cup)

क्रिकेट या खेळाची आर्थिक स्थिती बळकट करण्याचे एक मजबूत साधन भारत असल्याचे वक्तव्य Renaissance Investment Managers Pvt. कंपनीच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि संस्थापक पंकज मुरारका त्यांनी केले आहे. BCCI ही क्रिकेट संघटना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून ओळखली जाते, आणि म्हणूच आपल्या देशाकडून क्रिकेटमध्ये केली गेलेली गुंतवणूक ही इतरांच्या तुलनेत ही कधीही जास्तीच असते. आपल्या देशात क्रिकेटच्या खेळाडूंना मिळणारे मानधन हे इतर खेळाडूंच्या तुलनेत अधिक आहे. एवढी मोठी गुंतवणूक करून सुद्धा देशाला हवा तसा परतावा मिळत नसल्यामुळे (Cricket World Cup) भारताला आर्थिक नुकसान सोसावे लागते.

भारतात क्रिकेट हा कुठल्याही धर्माशिवाय कमी नाही, इतर कोणत्याही खेळापेक्षा क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळाडूंना मिळणारं प्रेम हे कधीही जास्तीच असतं. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पोहोचून हार पत्करली असताना देखील काही खेळाडूंच्या कमाईत दरवेळीप्रमाणे भली मोठी वाढ होणार आहे, कारण भारताने जरी विश्वचषक जिंकला नसला तरीही सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे आणि यामुळेच विश्वचषकाची ब्रँड व्हॅल्यू वाढायला मदत झाली.

इतर खेळांमध्ये गुंतवणूक केलेली फायद्याची:

आपल्या देशात क्रिकेट या खेळाला दिलं गेलेलं महत्त्व हे इतर खेळांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. क्रिकेटच्या मागे आपण एवढे दिवाने झालेलो आहोत की इतर खेळांनां पूर्णपणे दुर्लक्षित करून टाकले आहे. क्रिकेटमध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकी मधला 10 टक्के वाटा सुद्धा जर का इतर खेळांमध्ये गुंतवला तर देशाला मोठा परतावा मिळू शकतो असे तज्ञांचे मत आहे.