Crude Oil Import: “जिथे स्वस्त तेल मिळेल, तिथून खरेदी करू”; भारताला तेल विकण्यासाठी जगभरात मोठी रांग

Crude Oil Import : आपण जगभरातील विविध व्यापाऱ्यांकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो. भारत हा जगात कच्च्या तेलाचा एक प्रमुख ग्राहक आहे. काही दिवसांपूर्वी आपण रशिया या देशाकडून कच्च्या तेलाची आयात कायमची बंद केल्याच्या बातम्या बाजारात फिरत होत्या. मात्र आता यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी समोर येत माध्यमांना खरी माहिती पुरवली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार भारताने रशिया सोबतचा कोणताही व्यवहार बंद केलेला नाही, उलट रशिया आणि भारत यांच्यात होणाऱ्या व्यवहार हा कैक पटीने वाढलाच आहे. पुढे केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की, “जो व्यापारी देश आपल्याला स्वस्त किमतीत कच्या तेलाची विक्री करेल, भारत त्यांच्याकडून तेल विकत घेईल”. भारतात कच्या तेलाची विक्री करण्यासाठी जगातील अनेक देश रांगा लावून उभे आहेत.

रशिया कडून भारताने आयात कमी केली आहे का?(Crude Oil Import)

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी माध्यमांसह संवाद साधत कच्च्या तेलाच्या आयातीबद्दल सविस्तर माहिती पुरवली. त्यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि रशिया यांच्यातील व्यवहार अजूनही कायम आहे. आकडेवारी मांडताना ते म्हणाले की, गेल्या वर्षी फेब्रुवारी 2022 पर्यंत रशियामधून केलेली तेलाची आयात आमच्या एकूण वापराच्या केवळ 0.20 टक्के होती. यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे अडचणी निर्माण झाल्या व रशियाने भारताला कच्च्या तेलावर सवलत मिळवण्याची ऑफर दिली. भारताने देखील त्वरित या संधीचा स्वीकार केला आणि त्यानंतर तेलाची आयात वाढत 40 टक्क्यांवर येऊन पोहोचली आहे. आता जर का भारत आणि रशिया यांच्यातील आयात कमी जरी झाली तरीही यावरून भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार संपुष्टात आलाय असं म्हणणं चुकीचं ठरेल.

“ज्याच्यांकडे तेल आहे त्यांच्याकडून खरेदी करू”:

माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारत हा जगभरात तेलाचा ग्राहक म्हणून प्रसिद्ध आहे. आणि वेळोवेळी भारत आयती संधर्भात योजना बदलत असतो. जगात ज्या व्यापाऱ्याजवळ तेल आहे भारत त्याच्या जवळून तेलाचे खरेदी करेल. यामध्ये देशाच्या सरकारची केवळ एकच मागणी आहे की भारतीय ग्राहकांना तेल कोणत्याही व्यत्ययाशिवाय अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळाले पाहिजे. (Crude Oil Import).

हरदीप सिंग पुरी यांच्या मते, भारतातील कच्च्या तेलाचा दैनंदिन वापर 5 दशलक्ष बॅरल आहे आणि त्यापैकी सध्या 1.5 दशलक्ष बॅरल रशियाकडून खरेदी केले जात आहे. म्हणजेच भारत आजही आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 20 टक्के तेल रशियाकडून विकत घेत आहे. पुरी म्हणाले की, सध्या तेल विकणारे देश रांगेत उभे आहेत आणि भारताला ऑफर देत आहेत. काही देश रशियापासून थोडे दूर असतील, पण ते म्हणतात की आम्ही भारताला रशियापेक्षा स्वस्त तेल देऊ, मग या देशांकडून कच्चे तेल घ्यायला आम्हाला काय हरकत आहे? “जिथे स्वस्त तेल मिळेल, तिथून खरेदी करू”. यामध्ये कोणालाही अडचण नसावी असे स्पष्ट शब्दात केंद्रीय मंत्री म्हणाले आहेत.