Crude Oil Price : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; कारण जाणून घ्या…

Crude Oil Price : जसं की तुम्हाला माहिती असेल कि आपण कच्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहोत. आणि सध्या जगात चालेली परिस्थती बिकट असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम तेलांच्या किमतींवर झालेला पाहायला मिळाला, पण आता अचानक कच्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाल्याची बातमी समोर आली आहे. कच्या तेलाच्या किमतींमध्ये 5 टक्के घसरण झाल्यामुळे नवीन ब्रेंट क्रूडची किंमत 80 रुपये प्रती बॅरेल झाली आहे. आज आपण याबाबत जाणून घेऊया थोडक्यात सारं काही…

तेलाच्या किमती घसरल्या : Crude Oil Price

इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धाचा विपरीत परिणाम कच्या तेलाच्या किंमतींवर (Crude Oil Price) झालेला पाहायला मिळाला. या किमती एवढ्या वाढल्या होत्या कि आकड्याने 93 डॉलर्सचा आकडा पकडला होता. मात्र अचानक या कच्या तेलांच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे अनेक देशांना फायदा होणार आहे. हि पाच टक्क्यांची झालेली घट आपल्या देशातील लोकांना सुटकेचा निश्वास घ्यायची संधी देणार आहे. कच्या तेलांच्या किमतींमध्ये 5 टक्क्यांची घट झाल्यामुळे आता नवीन तेलाची किंमत 79.80 टक्के प्रती बॅरेल झाली आहे. यासोबतच WTI च्या किमतींमध्ये सुद्धा घसरण झालेली असल्यामुळे नवीन किमती 75.62 रुपये प्रती बेरल झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कच्या तेलाला मिळणारी मागणी कमी झाल्यामुळे आता तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे अशी बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धामुळे USA कडून कच्च्या तेलाला मिळणारी मागणी कमी झाली मात्र तेलाचा पुरवठा आधीसारखाच होत होता. याव्यतिरिक अजून एक महत्वाचं कारण म्हणजे Dollar Indexचा वाढलेला क्रम आहे. या एक न अनेक कारणांमुळे कच्या तेलाच्या किमतीत घट (Crude Oil Price) झाली आहे आणि दिवाळीच्या अगोदर हि आपल्याला मिळालेली मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल.