Cyber Crime: पार्ट- टाईम कामाचे अमिश दाखवून पुण्यातील महिलेला 17 लाखांचा गंडा

Cyber Crime: प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात. त्यामुळे ह्या बदलत्या तांत्रिक जगात चांगल्या बरोबरच वाईटही अनेक घटना घडलेल्या पाहायला मिळत आहेत. चोर आणि दरोडेखोर वृत्तीची माणसं याच तांत्रिक बदलांचा चुकीच्या मार्गाने वापर करत सामान्य जनतेला लुबाडण्याचे वाईट काम करतात. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उघडकीस येत असलेली अनेक चोरीची उदाहरणं तुम्ही पाहिली असतीलच, अशावेळी प्रत्येक माणसाने होईल तेवढी सतर्कता बाळगून स्वतःची तसेच आजूबाजूच्या जवळच्या मंडळींचे योग्य ती काळजी घेतली पाहिजे. पुण्याच्या एका भागामधून याच संदर्भात एक बातमी समोर आली आहे, जिथे भोळ्या भाबड्या महिलेला पार्ट-टाईम कामाचं अमिश दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. सदर प्रकारची चौकशी पोलिसांकडून सुरु असून अद्याप गुन्हेगार सापडलेले नाहीत.

नोकरीचे आमिष दाखवून महिलेला लुबाडले: (Cyber Crime)

टेक्नॉलॉजीच्या या काळात चुकीच्या मार्गांचा अवलंब करून अनेक मंडळी भोळ्या-भाबड्या लोकांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात. वाढत्या महागाईमुळे साहजिकपणे प्रत्येक माणूस हा नोकरीच्या शोधात असतो आणि याच गरजेला ओळखून काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं चोरी आणि दरोडेखोरी यांसारख्या प्रकारांना चालना देतात.(Cyber Crime) अलीकडेच पार्ट-टाइम जॉब मधून भरघोस परतावा मिळवा असे सांगून पुण्यात एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील मुंडवा परिसरात राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेने शनिवारी सदर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.

महिलेची नेमकी फिर्याद काय:

महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटल्यानुसार 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 2023 या दरम्यान हा प्रकार घडला आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीने या महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पुढे “तुम्ही पार्ट टाइम जॉब मध्ये इच्छुक आहात का?” असे विचारून तिला टेलिग्राम वर एका ग्रुपमध्ये जोडण्यात आलं. मुळातच संपूर्ण योजना बनवून आलेल्या या टोळीने सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पीडित महिलेला वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यासाठी देऊ केले, त्या बदल्यात या महिलेला वेळोवेळी मोबदला देऊन तिचा विश्वास संपादन केला (Cyber Crime). आणि यानंतर हळूहळू आपली योजना अंमलात आणण्यास सुरुवात केली. या चोरांनी महिलेला 70 लाख 40 हजार रुपये गुंतवायला सांगून टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करून तिची फसवणूक केली.

मात्र काही काळानंतर पैसे परत न मिळाल्याचे लक्षात येऊन सायबर क्राईमच्या अंतर्गत आपली फसवणूक करण्यात आली आहे हे महिलेचा लक्षात आले. पीडित महिलेने वेळ न वाया घालवता पहिले थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत, या अज्ञात वापरकर्त्याविषयी तक्रार नोंदवली आणि सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत. टेक्नॉलॉजी कितीही वृद्धिंगत होत असली तरी अशा दुष्ट वृत्तीची माणसं वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला लुटायचा प्रयत्न करीत असतात म्हणूनच प्रत्येकाने सावधानगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे.