Cyber Crime : देशांर्गत वाढणारे ऑनलाईन गुन्हे रोखण्यासाठी सरकारकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. अद्याप हे प्रमाण आटोक्यात आले नसल्याने आता पुन्हा एकदा सरकारने देशाच्या रहिवाश्यांना सुरक्षित राहण्याचा इशारा दिल आहे, तसेच सायबर गुन्हे कसे घडतात याबद्दलही माहिती पुरवली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर केलेल्या संदेशात ते म्हणतात की सध्या OTP देखील न मागता देशात अनेकांची फसवणूक होत आहे, ही लोकं तुम्हाला हॅकिंगपासून(Hacking) वाचवण्याचे अमिश दाखवतात मात्र शेवटी सामन्यांना लुटून पसार देखील होतात. अश्या चोरट्या हेतूंपासून कायम सावध राहावे असा इशारा गृह मंत्रालयाने जाहीर केला आहे.
भामट्यांचा नवीन प्रकार कोणता? (Cyber Crime)
मुळातच चोरी आणि लुटालुटीच्या उद्देशाने वावरणारी काही लोकं एक मोबाईल नंबर बाजारात फिरवत आहेत, आणि त्यांच्याकडून लोकांना हा नंबर नक्की डायल करावा आणि सुरक्षित राहावे असा संदेश दिला जातोय, असे न केल्यास तुमचा मोबाईल फोन कायमचा बंद होईल असा धमकी वजा संदेश त्यात असल्याने लोकं हा चोरीचा नवीन प्रकार ओळखू शकत नाहीत, आणि परिणामी ते फसवणुकीचे शिकार बनतात. *401#99963….45 सारख्या एखाद्या नंबरवरून जर का तुम्हाला देखील असाच संदेश आला असेल तर यावर मुळीच विश्वास ठेऊ नये.
या गुन्हांपासून कसे सावध व्हाल?
आपल्या आजूबाजूला गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे, केवळ तक्रारी नोंदवून आणि सरकारने सावध राहण्याचे इशारे देऊन यात काहीही विशेष बदल झालेला दिसून येणार नाही. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी उचलली पाहिजे. कुठल्याही अपरिचित नंबरवरून कोणी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा संपर्क वाढू देऊ नका. कारण कोणीही तुमचे सिमकार्ड किंवा मोबाईल नंबर हॅक झाल्याची माहिती फोन करून देत नसतो(Cyber Crime). एवढेच नाही तर अनेकवेळा हे गुन्हेगार तुम्हाला लुबाडण्यासाठी विविध प्रकारचे ऍप डाउनलोड करायची मागणी करतील मात्र कोणत्याही परिस्थितीत अशी फसव्या सूचनांना बळी पडू नका. VPN सारखा ऍप तुमचा मोबाईल हॅक करू शकतो, त्यामुळे या सारखा कोणताही ऍप डाउनलोड करू नका आणि अपरिचित मोबाईल नंबर्सशी संपर्क ठेऊ नका.