Cyber Crime : टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे माणसाचं जीवन अनेक बाजूनी सोपं झालेलं असलं तरीही या क्षेत्रात वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करून सामान्य जनतेला लुबाडण्याचे प्रकार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अलीकडेच मुंबई सायबर पोलिसांकडून अशाच बद्दलचा एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वीस वर्षीय एका मुलीने तिच्या बँक मधून तीन लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलीस खात्यात नोंदवली आहे. हे वाढणारे प्रकार लक्षात घेता आपण दैनंदिन जीवनात किती जागरूकता पाळली पाहिजे याचा पुरेपूर अंदाज येतो. हा चोरीचा प्रकार नेमका काय जाणून घेऊया…
टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात उडाली खळबळ: (Cyber Crime)
मुंबई सायबर पोलिसांकडे वीस वर्षीय IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मुलीने बँक अकाउंट मधून एकूण तीन लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. मुलीच्या सांगण्यावरून तिने कोणत्याही लिंकवर क्लिक केलेले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा गोपनीय OTP इतरांसोबत शेअर केलेला नाही. असे असताना देखील तिच्या अकाउंट मधून तीन लाख रुपयांची मोठी रक्कम अचानक चोरीला गेल्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मनात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीची जबर भीती बसली आहे.
ही वीस वर्षांची तरुणी गेल्या काही वर्षांपासून एका परदेशी कंपनीसोबत काम करते. फसवणुकीचा अनुभव सांगताना ती मुलगी म्हणते की, तिला डिसेंबर महिन्यात कार्यालयीन टेलिग्राम ॲपवर अनेक मेसेजेस येत होते. सुरुवातीला तिने या मेसेजेसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले मात्र अचानक एका मेसेज मध्ये तिचा मेल आयडी सामावलेला दिसला. पीडित मुलगी सांगते की त्या मेसेजमध्ये “जर का तुम्हाला फंड हवा असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील” असा संदेश पाठवण्यात आला होता.
ताबडतोब बँक स्टेटमेंट चेक केल्यावर तिला बँक अकाउंट मधून जवळपास 2 लाख रुपये तर दुसऱ्या बँक अकाउंट मधून 1.6 लाख रुपये गायब झाल्याचे धक्कादायक बातमी मिळाली (Cyber Crime). पुढे तपास केल्यानंतर UPI च्या माध्यमातून कोणीतरी ही रक्कम काढल्याची बातमी उघडकीस आली, शिवाय 20 हजार आणि 40 हजार रुपयांची रक्कम IMPS च्या माध्यमातून लंपास करण्यात आल्याची बातमी समोर आली.
बँकच्या अधिकाऱ्यांवर संशयाची सुई:
पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार तिने कोणासोबतही OTP शेअर केलेला नाही किंवा कुठल्याही अनधिकृत लिंकवर व्यवहार केलेला नाही. म्हणूनच आता बँक कर्मचारी या सायबर गुन्ह्यामध्ये सामावलेले असल्याचा आरोप तिने बँकेच्या अधिकाऱ्यांवर केला आहे, तसेच मुद्दामून आपला डेटा लिक करण्यात आलाय असाही आरोप अधिकाऱ्यांविरुद्ध लावण्यात आला आहे. OTP किंवा वैयक्तिक माहिती शिवाय कोणत्याही बँक मधून पैसे काढले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे बँकच्या अधिकाऱ्यांचा सदर गुन्ह्यामध्ये समावेश असल्याशिवाय एवढी मोठी रक्कम लंपास करणे शक्य नाही असे तिचे म्हणणे आहे.
पीडित मुलीची तक्रार नोंदवून लगेच पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा (Cyber Crime) दाखल करून घेतला आहे तसेच या सर्व प्रकारचा तपास पोलीस करत आहेत.सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आपण सर्वांनीच दैनंदिन जीवनात सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरून आपल्याकडून कुठली चूक होत नाहीये ना? याबाबत नेहमीच पडताळणी करून घेत रहा. सायबर हेल्पलाइन नंबर 1930 आणि पोलीस कंट्रोल रूम क्रमांक 100 वर वेळेत कॉल करून अधिकाऱ्यांशी मदत मिळवा.