Cyber Crime : देशात डिजिटल फसवणुकीचा आकडा वाढलाय; शिकार व्हायचे नसेल तर ‘हे’ लक्ष्यात ठेवा

Cyber Crime: तांत्रिकी बदल जेवढे चांगले तेवढेच वाईट. साधारणपणे कुठल्याही गोष्टीच्या बाबत हा नियम लागू होतो एखादी गोष्ट जेवढी तुमच्या फायद्याची आहे तेवढेच किंवा त्याहीपेक्षा जास्ती त्याचं तोटे असू शकतात. आजूबाजूला झालेले तांत्रिक बदल हे खरोखर प्रत्येकाच्या फायद्याचा ठरतायत, कारण छोट्यातल्या छोटी काम तसेच फार मोठमोठाली कामं सुद्धा घरबसल्या करता येत आहेत. खासकरून पैशांच्या बाबतीत जे काम रखडून किंवा अडकून पडतात यांसाठी आता प्रत्येक वेळी बँकच्या दारापाशी जाण्याची गरज नाही, ती घरबसल्याच पूर्ण होऊन जातात पण आजच्या काळात डिजिटल पेमेंटचा हा झालेला वापर हा काही अंशी वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकींना सुद्धा सुरुवात करतोय. बहुतांश लोकं हे डिजिटल पद्धतीचा वापर करत असल्यामुळे डिजिटल पेमेंट द्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे.

डिजिटल पेमेंटच्या आधारे होणाऱ्या फसवणुकी वाढल्या: (Cyber Crime)

समोर आलेले आकडे सांगतात की, गेल्या तीन ते चार महिन्यात डिजिटल पेमेंटच्या संबंधित फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून या फसवणुकी थांबवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणि कायदे लागू करण्यात येतात. पण तरीही हवा तो ताबा मिळवणे अद्याप शक्य न झाल्यामुळे डिजिटल क्षेत्रात वाढलेली ही फसवणूक थांबण्यासाठी आता येणारा काळातच विविध यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय ठेवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे

आतापर्यंत डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने सायबर क्राईम किंवा आर्थिक फसवणुकीत गुंतलेल्या 70 लाख मोबाईल क्रमांकांना कायमचे निलंबित केले आहे आणि यामुळे 900 कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक थांबली आहे. सरकारकडून सर्व बँकांना त्यांच्या एपद्वारे करण्यात येणाऱ्या डिजिटल पेमेंट बाबत होईल तेवढी सावधानगिरी बाळगण्याची आज्ञा केली आहे, व त्यांची बँकिंग प्रणाली कशा प्रकारे जास्त सक्षम करता येईल यावर भर देण्यास सांगितले आहे.

यासोबतच आपल्या देशामध्ये डिजिटल फसवणुकीबाबत (Cyber Crime) समाजात जनजागृती करण्याची गरज असल्याचे वित्तीय सेवासचिव विवेक जोशी म्हणाले. मंगळवारी झालेल्या या बैठकीत गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर क्राईम अकॉर्डिनेशन सेंटर यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलला डिजिटल पेमेंट फसवणुकीचा नवीन डेटा शेअर केला. झालेल्या बैठकीत डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी नवीन एप देखील तयार करण्यावर चर्चा करण्यात आली आहे ‌.

डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपण काय करावं?

सरकार वेळोवेळी जनतेच्या हितासाठी आवश्यक ती सारी पावले उचलून कार्य करीत असते तरीदेखील आपण वैयक्तिक पातळीवर काही सुरक्षित अंतर ठेवून वागणं हे कधीही आपल्याच फायद्याचं आहे. प्रत्येकाच्या मोबाईल फोनवर अनेक प्रकारचे नंबर, एसएमएस, वेगवेगळ्या लिंक्स शेअर केल्या जातात ज्याच्या माध्यमातून असे चोर आणि गुन्हेगार तुम्हाला लुटायचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे अधिकृत नसलेल्या किंवा तुम्हाला व्यवस्थित माहिती नसलेल्या अशा कुठल्याही फोन नंबर किंवा एसएमएसशी संपर्क साधू नका तसेच चुकीच्या लिंकवर क्लिक करून कुठलीही नवीन वेबसाईट ओपन करू नका ‌. डिजिटल फसवणुकीपासून (Cyber Crime) बचाव करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

तुमचा यूपीआय आयडी(UPI ID), स्कॅनर हा कुठल्याही अपरिचित व्यक्ती सोबत शेअर करू नये त्याचप्रमाणे तुमचा पासवर्ड हा देखील अत्यंत गोपनीय असला पाहिजे. बँक डिटेल्स मागणारा कुठलाही माणूस हा सदर बँकेतूनच आलेला आहे की नाही हि अत्यंत महत्वाची चौकशी करूनच त्यापुढे पावले उचलावीत. या धावपळीच्या जगात अनेक प्रकारचे गुन्हे वाढत असताना आपण वैयक्तिक पातळीवर सुरक्षित अंतर ठेवल्याने हे गुन्हे काही अंशी रोखले जाऊ शकतात हे कायम लक्ष्यात ठेवा.