D Mart चं सामान इतकं स्वस्त कसं? काय आहे यामागील गणित?

बिझनेसनामा ऑनलाईन । घरातली एखादी वस्तू संपली तर आई कुठे जाते? D-Mart मध्ये. D-Mart हा विशेषतः स्वस्त गोष्टींसाठी ओळखला जातो. आपल्याला गरजेच्या सर्व गोष्टी D-Mart मध्ये सवलतीच्या दारात उपलब्ध असतात, त्यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय घरासाठी D-Mart हा सर्वात चांगला पर्याय आहे. आज बहुकेत अनेकजण इथून महिन्याभराची सगळीच खरेदी करतात, मात्र या दुकानाची एवढी भरभराट कशी झाली माहिती आहे का? आणि D-Mart मध्ये तुम्हाला इतर दुकानांपेक्षा स्वस्त वस्तू कशा काय मिळतात? हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया.

कोणी सुरु केलं D Mart?

देशात बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना आपल्या गुरुस्थानी मानणाऱ्या राधाकिशन दमानी यांनी D-Mart ची सुरुवात केली. दमानी यांना देशातील अनेक श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक मानलं जातं. केवळ बारावी उत्तीर्ण दमानी यांची एकूण संपत्ती एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्ती आहे.

अशी केली D Mart ची सुरुवात

यश हे कोणलाही सहजरीत्या मिळालेलं नाही, आणि असं म्हणतात सहज मिळालेल्या यशाची किंमतही केली जात नाही. राधाकिशन दमानी यांची गोष्ट काही अशीच आहे. 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा नेरूळची फ्रेनचैझी घेतली जो प्रयत्न अपयशी ठरला , हार न मानता त्यांनी बोरवेल बांधण्याचा प्रकल्प सुरु केला ज्यातही त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये D-Mart चे पहिले दुकान उघडले , पण कोणत्याही भाड्याच्या जागेवर दुकान सुरु करणार नाही असा निश्चय त्यांनी केला होती. कधीकाळी वेळोवेळी अपयशी झालेल्या राधाकिशन दमानी यांच्या D-Mart चे संपूर्ण देशात 300 पेक्षा अधिक दुकानं आहेत, जी 11 विविध राज्यांमध्ये पसरलेली आहेत.

D Mart मधलं सामान स्वस्त का?

राधाकिशन दमानी यांना भाड्याच्या जागेवर दुकान सुरु करायचं नव्हतं, आणि याच निश्चयाचा त्यांच्या ग्राहकांना भरपूर फायदा होत आहे. D-Mart सुरु केलेल्या सगळ्या जमिनी राधाकिशन यांच्या स्वतःच्या आहेत, त्यामुळे कुणालाही भाडं देण्यास ते बांधील नाहीत. हा उरलेली 5-7% बचत ते माल कमी दारात विकण्यासाठी वापरतात. दुसरे कारण म्हणजे 30 दिवसांत माल संपवून नवीन माल मागवणे हे त्यांचे उदिष्ट आहे. ते आपल्या कंपन्यांना फार लवकर पेमेंट करतात ज्यामुळे उत्पादक सुद्धा त्यंना सवलतीच्या दारात वस्तू पोहोचवतात. ह्या सवलतीचा वापर ते लोकांना कमी किमतीत वस्तू उपलब्ध करवून देण्यात करतात.