DA Hike : राज्य सरकारची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; DA मध्ये 2 टक्क्यांनी वाढ

DA Hike : काही दिवसांपूर्वीच आपण एक बातमी पहिली होती जिथे DA च्या भत्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. याच संदर्भात आज एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. दिवाळी अगदीच पुढच्या आठवड्यात येऊन ठेपलेली असताना DA (Dearness Allowance)च्या रकमेत सरकार कडून वाढ केली असल्यामुळे कर्मचारी खुश होणार आहेत. हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठी हा लागू होणार आहे.

कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड : DA Hike

वरती म्हटल्या प्रमाणे काही दिवसांपूर्वी सरकारकडून DA च्या रकमेत वाढ करण्यात (DA Hike) आली होती. आता पुन्हा एकदा आपल्या राज्यातील कर्मचारी वर्गाला खुश करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा DA च्या रकमेत वाढ केली आहे. महाराष्ट्र सरकार DA च्या रकमेमध्ये 2 टक्क्यांची आणखीन वाढ करणार असून यामुळे नक्कीच राज्यातील कर्मचारी वर्गाची दिवाळी गोड होणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडून आलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता 42 टक्के ठरवण्यात आला होता व आता त्यात 2 टक्क्यांची आजून वाढ झाल्यामुळे नवीन आकडा 44 टक्क्यांवर पोहोचला आहे. या संदर्भात आज म्हणजेच बुधवारी राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने केली 42 टक्क्यांची वाढ:

देशात वर्षातून 2 वेळा महागाई भत्ता (DA Hike) वाढवला जातो. केंद्र सरकार कडून दिवाळीच्या अगोदरच केंद्रीय कर्मचार्यांसाठी DA च्या रकमेमध्ये 4 टक्क्यांची वाढ केली होती ज्यामुळे नवीन आकडा 42 टक्क्यांवरून 46 टक्के झालं होता. वर्षातून दोन वेळा वाढणाऱ्या या रकमेचा लाभ 1 जानेवारी आणि 1 जुलैच्या दरम्यान घेतला जातो. आपल्या देशात जवळपास 52 लाख लोकं केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात तर 60 लाख लोकं पेन्शन धारक आहेत. DA मध्ये होणारी वाढ हि नेहमीच त्यांच्या फायद्याची ठरते.