Dearness Allowance Hike : दिवाळीपूर्वी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4% वाढ

Dearness Allowance Hike : आता दिवाळीचा सण फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. हा सण सर्वात आनंदाचा आणि समृद्धीचा मानला जातो. याच आनंदात अजून थोडीशी भर घालण्यासाठी भारत सरकारकडून एक मोठी भेट देण्यात येणार आहे. मोदी सरकारने महागाई भत्त्यात 4% वाढ केली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाईच्या भत्यात वाढ करण्यास मंजुरी मिळाली असून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

मोदी सरकारची दिवाळी भेट: Dearness Allowance Hike

आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय मंजूर झाला आहे. यामुळे आता महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 42 वरून थेट 46 टक्के झाला आहे. बाजारात महागाई जेवढी जास्त असेल त्यानुसार हा भत्ता वाढवला (Dearness Allowance Hike) जातो आणि महागाईच्या भत्यात झालेल्या बदलांचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचारी वर्गाच्या पगारावर झालेला दिसतो. महागाईच्या भत्यात वाढ झाली तर कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळते. महागाईचा भत्ता म्हणजेच (DA) हा कर्मचारी वर्गाला दिला जातो तर महागाई सवलत (DR) पेन्शन धारकांना दिली जाते. या नवीन निर्णयाचा देशातील 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शन धारकांना फायदा होणार आहे.

वर्षातून दोनदा DA बदलतो:

केंद्र सरकार कडून वर्षातून दोन वेळा DA मध्ये बदल केले जातात. ज्याचा लाभ 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून घेतला जातो. आज झालेल्या बदलांमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अश्या तीन महिन्यांच्या थकबाकीचा समावेश असणार आहे. आजकाल महागाई जोरात वाढत आहे, तांदूळ, गहू, डाळ यांसारख्या प्रमुख धान्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि अश्यात सरकारने घेतलेला हा निर्णय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना सुखावणारा असेल. यापूर्वी सरकार कडून मार्च 2023 मध्ये DA च्या आकड्यात 4% वाढ करवून तो 42 टक्के करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या या मोठ्या निर्णयानंतर आता राज्य सरकार देखील आपल्या कर्मचार्यांच्या महागाई भत्यात वाढ करणार आहे.