बिझनेसनामा ऑनलाईन । केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ 1 जुलै पासून वाढ झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. सार्वजनिक उपक्रम विभाग DPE ने याबाबत माहिती देताना बोर्ड स्तरावर असलेल्या आणि त्या खालील पदांवरील अधिकारी आणि पर्यवेक्षकांसाठी ही पगार वाढ होणार असल्याचं सांगितलं. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात फिटमेंट फॅक्टर वाढणार असुन त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे असा घटक आहे जो कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल अडीच पटीने वाढतो.
वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक उपक्रम विभाग DPE ने बोर्ड स्तरावर असलेल्या आणि त्या खालील पदांवर येणाऱ्या अधिकारी आणि पर्यवेक्षकांसाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे. महागाई भत्ता मध्ये ही वाढ औद्योगिक महागाई भत्ता च्या आधारावर करण्यात आली आहे. 7 जुलैला जारी करण्यात आलेल्या निवेदनात सार्वजनिक उपक्रम विभागाने सांगितलं की, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या बोर्ड स्तरावरील आणि त्या खालील अधिकारी नॉन युनिफाईड पर्यवेक्षकांच्या महागाई भत्ता मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या महागाई भत्ता मध्ये 39.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. परंतु हा महागाई भत्ता 42 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता होती. यापूर्वी हा महागाई भत्ता 2.57 एवढा होता. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 3500 रुपये प्रति महिना आहे त्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ होणार आहे. ही वाढ 701.9 टक्के म्हणजेच 15428 रुपये होईल. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 3500 ते 6500 रुपयांपर्यंत आहे त्यांच्या पगारात महागाई भत्ता 526.4 टक्क्यांनी वाढून 24,567 रुपये होईल. त्याचबरोबर 6500 ते 9500 एवढे वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 421.1 टक्के महागाई भत्ता वाढून 34,216 रुपये एवढा होईल.
केंद्र सरकार कडून दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये महागाई भत्ताच्या दरांमध्ये सुधारणा होत असते. बाकीच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात येण्याची घोषणा लवकरच होऊ शकते.