बिझनेसनामा ऑनलाइन | आजकाल अनेकांचा कल स्वतःचा व्यवसाय (Decoration Business) सुरु करण्याकडे वळत आहे. ह्याला एक कारण म्हणजे office-work मध्ये आत्ता एवढ्या संधी उपलब्ध नाहीत. असल्या तरी सुद्धा एका जागेसाठी अनेक पर्यायांमुळे स्पर्धा वाढत चालली आहे. दुसरं कारण म्हणजे आजच्या तरुण पिढीला कुणाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नसते. अश्यावेळी मग आपला व्यवसाय असणं सोयीस्कर ठरत . व्यवसायाचे प्रकारसुद्धा बदलत चालेले आहे. तरुण पिढी स्वत:च्या बुद्धीचा पुरेपूर वापर करत आपल्या कौशल्याचा जोरावर प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. आज आम्ही इथे एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत, जिचा वापर करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. एवढाच नाही तर कमीत कमी दिवसांत इथे तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.
नेमका कोणता आहे हा व्यवसाय ?
जसं कि आपण सगळेच जाणतो कि आजकाल फक्त लग्न किंवा मुन्जींचा मोठा सोहळा होतो असं नाही तर Birthday Party, Success Party, Get-To-Gather या सारख्या गोष्टी सुदधा मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जातात. आणि इथे गरज असते ती म्हणजे सजावटीची (Decoration). त्यामुळे तुम्ही Decoration Business सुरु करू शकता. पाहायला गेलं तर जुन्या पद्धतीच्या Decoration चा वापर कुणी करत नाही पण काही वेळा थोड्या प्रमाणात पारंपारिक Decorationची गरज असते ( लग्न,हळदी समारंभ, गृहप्रवेश ) त्यामुळे जर का तुम्ही अश्या व्यवसायचा विचारात करत असाल तर नक्कीच तुम्हाला दोन्ही प्रकारांसाठी तयार असणं भाग आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे इथे तुम्हाला जास्ती गुंतवणूक न करता पहिल्या कमाईपासूनच फायदा होत असतो.
Decoration Business ची सुरुवात कशी कराल?
कोणत्याही व्यवसायाची सुरुवात ही छोट्या प्रमाणत करावी. कमी गुंतवणूक करत आपल्याला किती फायदा होऊ शकतो ह्याचा अंदाज घ्यावा. Decoration च्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही केवळ 10 हजार रुपयांत करू शकता. सगळ्यात आधी आपला दुकान/Office सुरु करावं. हा जमाना Online Marketing चा आहे, जास्तीत जास्त लोकं Social Mediaचा वापर करुन बाजारात चालेल्या घडामोडींचा अंदाज घेत असतात. त्यामुळे तुमची सुरुवातीपासून एक Social Media Page असावे . इथे तुमचा नेमका कोणता व्यवसाय आहे व सोबतची आवश्यक माहिती द्यावी. शेवटी ग्राहकांना तुमची पर्यंत पोहोचता यावा यासाठी Contact Number किंवा Email-id द्यावा. जर का वेळेबरोबर तुमच्या व्यावासात सुधारणा होत असेल तर नक्कीच तुम्ही व्यवसाय वाढवू शकता. इथे तुम्हाला कामगारांची गरज असणार आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण टीमचे नेतृत्व करता आलं पाहिजे.
Decoration Business साठी या गोष्टी महत्वाच्या आहेत:
साधारण अंदाज घेता फुलांच्या माळा, Lights, पुष्पगुच्छ या गोष्टींच वापर नक्कीच केला जातो. या सर्व गोष्टी कोणत्याही समारंभात आवर्जून वापरल्या जातात त्यामुळे ह्यामध्ये सुरुवातीलाच गुंतवणूक करावी. तुमच्या व्यावसायच्या सुरुवातीला तुमच्याजवळ Artificial फुलं-पानं, फुगे, Lights हे मुबलक प्रमाणात असावं. हळू हळू व्यावसात फायदा झाल्या नंतर तुम्ही इतर महत्वाच्या गोष्टी विकत गेऊ शकता.
या Decoration Business मधून कित्ती कमाई होईल ?
एकतर ह्या व्यवसायातून तुम्ही लवकरात लवकर भरपूर पैसे कामावू शकता. आणि लग्नाच्या काळात ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि सोबत तुमची मिळकतही वाढते . एखाद्या कार्यक्रमातून 30-40 टक्क्यांचा भाग तुम्हाला होणारा फायदा असतो. त्यामुळे जर का खरचं तुम्ही आकर्षक व्यावसायाच्या शोधात असाल तर Decoration Business चा विचार करा आणि क्षणांत भरपूर कमाई करा .