Deepinder Goyal Success Story: तुम्ही व्यवसायाचे चाहते आहात का? आणि तुमचं उत्तर हो असेल तर शार्क टँक इंडिया हा कार्यक्रम पाहता का? सध्या या कार्यक्रमाचा तिसरा सिझन सुरु असून यात तीन-चार नवीन कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी सामील करण्यात आलं आहे, आणि यातीलच एक नाव म्हणजे Zomato आणि Blinkit चे सर्वेसर्वा दीपिंदर गोयल. चला तर मग जाणून घेऊया गोयल यांचा एकूण प्रवास कसा होता…
दीपिंदर गोयल: जन्म आणि शिक्षण
5 जानेवारी 1983 रोजी पंजाबमधील मुक्तसर येथे जन्मलेल्या दीपिंदर गोयलमध्ये उद्योजकतेची चेतना लहानपणापासूनच रुजली होती. भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्लीमधून गणित आणि संगणनशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एक अशी वाटचाल सुरू केली ज्याने आज अन्न उद्योगाचे चित्रच बदलून टाकले. त्यांच्या कल्पकतेतून जन्म झालेल्या झोमॅटोमुळे आज आपण आपल्या आवडत्या हॉटेलमधून केवळ काही सेकंदांमध्ये जेवण घरी मागवू शकतो. त्यांचं हे यशस्वी स्टार्टअप फक्त एक सोय नव्हे तर अनेकांना रोजगाराची संधी आणि हजारो हॉटेल्सना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं व्यासपीठ ठरलं आहे.
Zomato ची सुरुवात: (Deepinder Goyal Success Story)
2008 मध्ये दीपिंदर आणि त्यांचे सहसंस्थापक पंकज चढ्ढा यांनी झोमॅटोची सुरुवात केली होती. जेवणाऱ्यांना नेहमी असणारा प्रश्न म्हणजे रेस्टॉरंट्स, त्यांचे मेन्यू आणि इतर ग्राहकांच्या अनुभवांबद्दल माहिती मिळवणे. झोमॅटोने ही समस्या सोडवण्याचा विचार केला, आणि त्यातूनच नवीन कंपनीचा जन्म झाला. लवकरच झोमॅटो भारतात लोकप्रिय झाला आणि जागतिक स्तरावर विस्तारला. आज FoodTech क्षेत्रात झोमॅटो आघाडीचे स्थान राखून आहे.
Zomato: एक अनुभव बदलणारी क्रांती
गोयल यांची वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे. एकेकाळी छोटी सुरूवात करून, आज झोमॅटो जगभरातील अनेक देशांमध्ये पोहोचलेल्या या कंपनीने लाखो लोकांच्या जेवणाच्या सवयी बदलून टाकल्या आहेत. या मागे दीपिंदर गोयल (Deepinder Goyal Success Story) यांचं धैर्य, नाविन्यपूर्ण विचार आणि अढळ वचनबद्धता हे प्रमुख कारण म्हणावं लागेल.
झोमॅटोने केवळ जेवण ऑर्डर करण्याची सोय उपलब्ध करून दिली नाही, तर लोकांना वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट्सशी जोडून राहण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करून दिला. झोमॅटोमुळे आता आपल्या आवडत्या पदार्थ अगदी सहजतेने आणि वेगात घरबसल्या चाखता येतो, त्यामुळे झोमॅटो ही फक्त कंपनी नसून, लोकांच्या जेवणाच्या अनुभवांच बदलून टाकणारी क्रांती आहे असं म्हणूयात.