Delta Corp Project In Goa : गोवा हे भारतातील सर्वात छोटे राज्य असले तरीही पर्यटनासाठी याची चर्चा सर्वत्र केली जाते. गोव्याचे समुद्र किनारे, कसिनो आणि काल्बिंग हे अनेकांचे आकर्षण आहेत. काही दिवसांपूर्वीच गोव्यातील प्रसिद्ध बेस्लिका-दे-बॉम- जीजस या चर्चमध्ये सेंट झेवियर्सची जत्रा संपन्न झाली. झेवियर्सला गोव्यात ‘गोयचो साहेब’ म्हणजेच गोव्याचा मालक म्हणून संबोधलं जातं, म्हणूनच जत्रेची ख्याती सुद्धा सर्वत्र पसरलेली आहे, दरम्यान अनेक भाविकांच्या रांगा काल चर्चच्या बाहेर लागल्या होत्या. देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक मंडळी दरवर्षी गोव्याला भेट देतात. सध्या सुरु असलेला डिसेंबर म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळच्या जय्यत पार्टीसाठी कित्येक पर्यटकांच्या रांगा गोव्याच्या किनाऱ्यावर पाहायला मिळत आहेत. अश्या उत्साही वातावरणात प्रसिद्ध डेल्टा या गेमिंग कंपनीवर GSTची थकबाकीची नोटीस जारी करण्यात आली आहे, काय आहे एकूण प्रकरण पाहूयात…
प्रसिद्ध डेल्टाच्या नावे GSTची नोटीस: (Delta Corp Project In Goa)
GST संचालानाकडून गोव्यातील प्रसिद्ध गेमिंग कंपनी डेल्टा यांच्या नावे एकूण 23204 कोटी रुपयांची थकबाकीसाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. गोव्यात चालणाऱ्या या गेमिंग प्रकारांमध्ये डेल्टा हि सर्वात मोठी कंपनी समजली जाते. यानंतर आता डेल्टा कॉर्पकडून धारगळ (पेडणे तालुका) येथून 3 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मागे घेण्याची तयारी सुरु झाली आहे, पेडणे तालुक्यात सुरु होणारा हा मेगा रिसोर्ट आणि गेमिंग प्रकल्प ठरणार होता. माध्यमांच्या माहितीनुसार या प्रकल्पामुळे गोव्यात 4573 नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता होती.
अद्याप तरी कंपनी काही काळासाठी हा प्रकल्प पुढे ढकलण्याच्या तयारीत असल्याची माहिती बाजारात पसरत आहे. कंपनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास सध्या महत्व देणार असल्याने हा प्रकल्प (Delta Corp Project In Goa) काही काळासाठी बाजूला सारण्यात आला आहे असे कंपनी म्हणते . मात्र माध्यमांच्या माहितीनुसार हि बातमी असत्य असून काही दिवसांतच हा प्रकल्प कायमचा बंद होणार आहे.
किती मोठा ठरला असता प्रकल्प-
याआधी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार प्रकल्पाअंतर्गत तीन हॉटेल्स, कन्व्हेन्शन सेंटर, मल्टीप्लेक्स सिनेमागृह, इलेक्ट्रोनिक सिटी, बँकवेट सुविधा तसेच मनोरंजनाची साधने अश्या अनेक घटकांचा यात समावेश करण्यात येणार होत, आणि प्रकल्पाचा आवाका पाहता गोवेकरांसाठी यामुळे खरोखरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या असत्या अश्या चर्चा केल्या जात आहेत. याबद्दल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे.
दरम्यान गोवा राज्य सरकारने नवीन प्रकल्प उभारण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले होते, तसेच गोवा गुंतवणूक व प्रोत्साहन मंडळाने हि जमीन गुंतवणुकीची जमीन असल्याचे अधिसूचित केले होते. सदर जमिनीवर 50 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असे आश्वासन राज्य सरकारने दिल्यामुळे हा प्रकल्प (Delta Corp Project In Goa) सरकारच्या नजरेतूनही महत्वाचा होता.