दररोज फक्त 1 तास काम अन पगार घेतोय कोटीत; हा तरुण नेमकं करतो तरी काय?

बिझनेसनामा ऑनलाईन । दिवसभरात जवळ जवळ 8 ते 9 तास काम करून साधारणपणे 20000 ते 30000 हजार पगार मिळतो. हाडाची काड करून 12 तास केलेली मेहनत सुद्धा फक्त 20000 हजारावर येऊन ठेपते. अशातच एक तरुण असा आहे जो दिवसभरात फक्त 1 तास काम करतो आणि त्याचा पगार चक्क कोटींमध्ये आहे. डेव्हॉन असं या तरुणाचे नाव असून तो नेमकं काय काम करतो त्यामागे त्याला कंपनी कडून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते हेच आज आपण जाणून घेऊयात.

डेव्हॉन आहे तरी कोण?

डेव्हॉन हा 20 वर्षाचा तरुण आहे. तो गूगलसाठी काम करतो. इंटर्नशिपसाठी गुगलला गेलेला डेव्हॉन आज करोडोची कमाई करतोय. डेव्हॉन हा टेक एक्स्पर्ट असून टूल अँड प्रॉडक्टसाठी कोडींग करतो. ही कोडींग केवळ एका तासात करून 1.2 कोटी रुपये तो वर्षाला आपल्या पदरात पाडतो. इतक्या भरमसाठ पगाराशिवाय कंपनाईकडून त्याला बोनस सुद्धा मिळतो. डेव्हॉनने इंटर्नशिपच्या वेळी खूप मेहनत करून गूगलमध्ये आपली जागा पक्की केली आणि आज तो आपल्या मर्जिनुसार मॅनेजरलाही मॅनेज करतो. डेव्हॉन हा त्यांच्या मॅनेजरच्या मेसेजला रिप्लाय द्यायलाही बांधील नाही. त्यामुळे सध्या तो प्रचंड चर्चेत आहे.

कोडींग म्हणजे काय?

कोडींग, ज्याला संगणक प्रोग्रामिंग असेही म्हणतात, आपण संगणकांशी संवाद कसा साधतो आणि त्यांना काय करावे हे सांगतो. कोडिंगद्वारे, व्यावसायिक वेबसाइट्स आणि अॅप्ससह प्रोग्राम तयार करू शकतात. आणि त्याद्वारे सर्व ऑपरेटर्स ऑपरेट केले जातात.

कोडिंग कशी सुरू करता येते

  1. तुम्हाला कोड का शिकायचे आहे ते शोधा.
  2. तुम्हाला प्रथम कोणती कोडिंग भाषा शिकायची आहे ते निवडा.
  3. ऑनलाइन अभ्यासक्रम घ्या.
  4. व्हिडिओ ट्यूटोरियल पहा.
  5. पुस्तके आणि ईबुक वाचा.
  6. कोड शिकणे सोपे करणारी साधने वापरा.
  7. इतर लोक कसे कोड करतात ते पहा.
  8. कोडिंग प्रकल्प पूर्ण करा.