Dharavi Redevelopment Project : जसं कि आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबई मधल्या धारावी झोपडपट्टिच्या पुनर्विकासाची बोली जिंकली होती. कैक वर्षांपासून मुंबईमधला धारावी प्रकल्प सुधारणेची वाट पाहत ताटकळत उभा आहे.मात्र आता अदानी समूह हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत असून एका परदेशी कंपनीसोबत त्यांनी या संधर्भात बोलणी केली आहे. बोली जिंकल्यानंतर गौतम अदानी यांनी एका खास कंपनीची नियुक्ती केली होती, जिच्याकडे केवळ धारावी प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूहाने एका परदेशी कंपनीचे या प्रकल्पावर काम करण्यासाठी चयन केलेलं असून लवकरच अनेक वर्षांपासून अडकून पडलेला धारावी प्रकल्प पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
परदेशी हाफिज कंपनीकडे प्रकल्पाची जबाबदारी : (Dharavi Redevelopment Project)
अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी मुंबई मधल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले असून यासाठी परदेशी आर्किटेक्ट हाफिज काँट्रॅक्टर्स यांची निवड केली आहे. सध्या मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणासह अदानी प्रॉपर्टीज यांनी धारावी प्रकल्पाची एकत्र येऊन जबाबदारी उचलली आहे. या संयुक्त उपक्रमामधून धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम संयुक्तपणे पूर्ण केले जाईल. तसेच समूहाकडून या उपक्रमासाठी एका जागतिक संघाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत होणाऱ्या या कामाला अधीकाधीक विरोध होत असला तरीही आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने समूहाकडून उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल म्हणावं लागेल. अदानी समूहाने निवड केलेल्या परदेशी कंपनीने आतापर्यंत अनेक मोठं मोठया जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. जागतिक स्तरावर काम करण्याऱ्या या कंपनीने हौसिंग सेक्टरच्या बाबतीत अमेरिकन डिझायन फर्म सासाकी (Sasaki) आणि ब्रिटिश कन्सल्टन्सी फर्म बुरो हैपोल्ड (Buro Happold) यांच्यासोबत हातमिळवणी केली होती.
619 मिलियन डॉलर्सची बोली जिंकला होता समूह:
गेल्या वर्षी जुलै महिन्यात गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली समूहाने मुंबईमधल्या प्रसिद्ध धारावी प्रकल्पाची बोली जिंकली होती. महाराष्ट्र सरकारने समूहाकडून 619 डॉलर्सना धारावी प्रकल्पाची बोली मंजूर केली होती (Dharavi Redevelopment Project). सध्या या झोपडपट्टीत सुमारे 10 लाख लोकं राहतात, मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या भागात हजारो गरीब कुटुंबांची वस्ती असल्याचं सांगितलं जातं. अश्या गरिबीत वावरणाऱ्या या लोकांजवळ शुद्ध पाणी आणि शौचालयाची देखील व्यवस्थित सोय उपलब्ध नाही. गेल्या अनके वर्षांपासून या क्षेत्राच्या पुरानर्विकासाचे काम रखडून पडले आहे, साधारणपणे वर्ष 1980 मध्ये या प्रकल्पाचा सर्वात पहिल्यांदा विचार करण्यात आला होत. बॉलीवूडद्वारे प्रदर्शित स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटात धारावीची गरीब परिस्थिती दाखवण्यात आली होती.