Dharavi Redevelopment Project : मुंबई या मायानगरीत असलेली धारावी झोपडपट्टी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या झोपडपट्टीच्या पुर्निर्माणाचे काम ठप्प झाले होते मात्र सध्या हा प्रकल्प सुधारणांसाठी अदानी समूहाच्या हातात देण्यात आला आहे. या प्रकल्पावर अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार एकत्र येऊन काम करतील. सध्या अदानी समूहाचे धारावी प्रकल्पावर काम सुरु असून, आज समूहाकडून धारावीचा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली, धारावी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी अदानीने 350 स्क्वेअर फुटांचे नवीन फ्लॅट्स सादर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि धारावीत राहणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या फ्लॅटचा आकार राज्य सरकारने दिलेल्या फ्लॅटपेक्षा सुमारे 17 टक्के जास्त असेल, असा दावा अदानी समूहाने केला आहे.
धारावीतील लोकांना मिळणार किचन आणि टॉयलेटची सुविधा: (Dharavi Redevelopment Project)
धारावी प्रकल्पाचे काम सुरू असताना अदानी समूहाकडून येथे राहणाऱ्या लोकांना नवीन फ्लॅटमध्ये किचन आणि टॉयलेटची सुविधा दिली जाणार आहे. अदानी समूहाने या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना 350 स्क्वेअर फुटांचे फ्लॅट दिले जाणार असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी देखील धारावी वसाहतींमधील रहिवाशांना 269 चौरस फुटांची घरे देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य सरकारने वर्ष 2018 पासून झोपडपट्टीतील रहिवाशांना 315-322 चौरस फुटांची घरे देण्यास सुरुवात होती.
अदानींची धारावीसाठी 61.9 कोटी डॉलर्सची बोली:
धारावी झोपडपट्टी ही मुंबई मधील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध झोपडपट्टी आहे. असं म्हणत आहेत की या संपूर्ण झोपडपट्टीने न्यूयॉर्क सेंट्रल पार्क(New York Central Park) प्रमाणेच आजूबाजूची जागा व्यापलेली आहे. इथे आजही लाखोंच्या संख्येत लोकांचे वास्तव्य आहे, ही लोकं संपूर्ण धारावी परिसरात छोटी छोटी घर बांधून आपले जीवन व्यतीत करतात, तसेच इथे काही भागांमध्ये त्यांचे व्यवसाय देखील पाहायला पसरलेले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून धारावी पुनर्निर्माणाचा प्रकल्प अडकून पडलेल होता, मात्र आता अदानी समूहाने धारावीचे चित्र बदलण्यासाठी 61.9 कोटी डॉलर्सची बोली लावून हा प्रकल्प आपल्याआधी घेतला आहे(Dharavi Redevelopment Project). आता प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गौतम अदानी यांना धारावीतील 625 एकर(253 Hector) भाग पुन्हा निर्माण करायचा आहे आणि धारावी झोपडपट्टीची एकूण सीमा पाहता हा प्रकल्प जगभरातील अनेक मोठ्या विकास योजनांपैकी एक म्हणून गणला जाऊ शकतो असे म्हणता येईल.