Dharavi Redevelopment: धारावीचे चित्र बदलण्यासाठी अदानी कंबर कसून तयार; फेब्रुवारी पासून होणार कामाचा श्रीगणेशा

Dharavi Redevelopment: गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील अडकून पडलेला सर्वात महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई मधली धारावीची झोपडपट्टी. जसं की आपण सगळेच जाणतो हा प्रकल्प सध्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि समूहाच्या हातात आहे आणि आता फेब्रुवारी महिन्यात आता धारावी प्रकल्पाचे काम सुरु होण्याची शक्याता वर्तवली जात आहे. हा प्रकल्प जर की यशस्वी झाला तर येणाऱ्या काळात 10 लाख लोकांचे जीवन कायम स्वरूपी बदलून जाऊ शकते. प्रकल्पाचे काम हाती घेण्याआधी इथे राहत असलेल्या लोकांना स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे, आता यात किती लोकांना मोफत घरं द्यावीत या नेमका आकडा शोधून काढण्यासाठी एका योग्य Survey ची गरज पडले, परिणामी काम सुरु करण्याआधी समूहाकडून हा Survey केला जाईल, आणि हा बायोमेट्रिक सर्वे (Biometric Survey) असेल.

धारावी वासियांना मोफत घर मिळणार? (Dharavi Redevelopment)

अदानी समूहाने या प्रकल्पाची जबाबदारी उचलल्यानंतर आता बऱ्याच पैकी कामाला सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे. इथे राहत असलेल्या लोकांना पुनर्निर्माणाच्या वेळी स्थलांतरित करण्याची गरज आहे. नियमांनुसार जी लोकं इथे वर्ष 2000 पासून राहतात त्यांना जुन्या घराच्या बदल्यात मोफत घर देण्यात येईल. या भागाच्या शेवटच्या सर्वेक्षणावेळी इथे जवळपास 7 लाख लोकं राहत असत आणि हे सर्वेक्षण कदाचित 15 वर्षांपूर्व करण्यात आले होते. मात्र आता समूहाची माणसं लोकांच्या घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. ही लोकं धारावीत राहतात की काम करतात, अश्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारले जातील व त्यांच्या मालकीची कागदपत्रे आणि बायोमेट्रिक माहिती गोळा केली जाणार आहे. ही सगळी माहिती गोळा करून झाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरु होईल.

धारावी झोपडपट्टी जवळपास 600 एकरमध्ये पसरलेली आहे, कधीकाळी हा परिसर शहराबाहेर होता, पण कालांतराने आता मुंबई शहराचा चित्र बदलले असून धारावी शहराच्या मध्यभागी आले (Dharavi Redevelopment). आज धारावीच्या एका बाजूला टोकाला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्ससारखे जागतिक दर्जाचे बिझनेस हब आहे आणि दुसरीकडे दादर, माहीमसारख्या जुन्या वस्त्या आहेत.