Diamond Price Fall : जगात सर्वात जास्ती जर का की महाग वस्तू जर का काही असेल तर ती म्हणजे हिरे .कोविडच्या महामारीनंतर अनेक बदल झाले, कितीतरी गोष्टींचे भाव बदलले ज्यात आता हिऱ्यांचा समावेश झाला आहे. पण हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कि जगभरात हिऱ्यांची किंमत घसरली आहे. याचं कारण माहिती आहे का? कोविडच्या काळात महाग वस्तूंचा खप जवळपास बंदच झाला होता. कदाचित अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे पैश्यांची चणचण वाढली असावी ज्याचा वाईट परिणाम अश्या गोष्टींच्या विक्रीवर झाला.
हिऱ्यांच्या किमतीत घसरण का? Diamond Price Fall
जिम्निस्की ग्लोबल राफ डायमंड एक्सचेंज नुसार हिऱ्यांच्या किमती सर्वात कमी पातळीवर आहेत. कोविडच्या काळात पैश्यांची कमतरता थोड्याफार प्रमाणात प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाने अनुभवली आहे, आणि त्यानंतर अश्या माणसांनी हिऱ्यांपेक्षा इतर मार्ग निवडला, जो कि त्यांच्यासाठी सोयीस्कर व खास करून परवडणारा होता. हे एक कारण असू शकतं.
इतर कारणांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल कि कोरोनाच्या काळानंतर लोकांनी चैनीच्या वस्तूंवर खर्च करण बंद केलेलं आहे, त्याएवजी तोच पैसा ते खाण्यावर, विविध जागा हिंडण्यावर खर्च करत आहे. कुठेतरी आता माणूस मिरवण्यापेक्षा अनुभाव जोडत आयुष्य जगण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. हिरा हि काही साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळे या बदलेल्या विचारांचा त्यांच्या किमतींवर परिणाम होणं साहजिक आहे. (Diamond Price Fall)
असा आहे CNN चा अहवाल:
CNN चा अहवाल पहिला तर लक्षात येईल कि वर्ष 2021 आणि 2022 मध्ये नैसर्गिक हिऱ्यांना अधिक मागणी होती. भारतातील सुरत हे ठिकाण हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सुमारे 500 पेक्षा जास्ती हिरे बनवण्याची उत्पादनं उपलब्ध आहेत. रशियातून सुमारे 75,000 कोटी रुपये हिरे पॉलिश करण्यासाठी इथे आणले जातात. तसेच भारतातील पॉलीश हिऱ्यांना अमेरिका, युएई सारख्या देशांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. कदाचित येणाऱ्या काळात हिऱ्याची किंमत पूर्वी सारखी होईल असा अंदाज लावला जात आहे.