Digital Currency : देशात सुरु होणार डिजिटल करन्सीचा खेळ; RBI कडून खास 9 बँकांची निवड

Digital Currency : सध्या आपण सर्व प्रकारे टेक्निकल दुनियेत वावरण्याचा प्रयत्न करतोय. पैश्यांच्या बाबतीत सुद्धा हाच नियम लागू होतो, नाही का? आपण अनेकवेळा केवळ Google Pay, Phonepay यांसारख्या ऑनलाईन पेमेंट्सचा वापर करतो. पण आजच समोर आलेली माहिती सांगते की भारतातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारकडून एक महत्वाचा आणि वेगळा विचार केला जातोय. कार्यरत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हिंदू महाविद्यालयाच्या 125 व्या वर्धापनदिनी बोलताना याबद्दल एक महत्वाची घोषणा केली, त्या म्हणाल्या की डिजिटल करन्सीचा वापर करून आपण सीमापार व्यापार सुरु करू शकतो.

डिजिटल करन्सी (Digital Currency) बद्दल काय म्हणाल्या अर्थमंत्री?

कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की लवकरच डिजिटल करन्सी म्हणजेच E- Rupeeचा वापर करून भारत विदेशी व्यापाराला सुरुवात करणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होईल व दोन देशांमध्ये होणाऱ्या देवाण घेवाणीचा खर्च देखील कमी होईल. या प्रस्तावावर सध्या सरकार आणि सर्वोच्य बँकेचा विचार सुरु आहे. तसेच, रिझर्व्ह बँकेने State Bank, Bank Of Baroda, Union Bank, HDFC Bank, ICICI Bank, Kotak Mahindra Bank, YES Bank, IDFC First Bank आणि HSBC अशा नऊ बँकांच्या साह्याने ‘CBDC’ अर्थात E-Rupee वापरासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू केला आहे.

पण E- Rupee म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? E- Rupee एक डिजिटल टोकन आहे. तो कागदी चलन आणि नाण्यांप्रमाणेच जारी केला जातो आणि बँका त्यांचे वितरण करता. आत्ताच्या घडीला यात सहभागी बँकांच्या डिजिटल वॉलेटद्वारे ग्राहक E- Rupee च्या माध्यमातून व्यवहार करू शकणार आहे(Digital Currency). सध्या भारत आपली अर्थव्यवस्था सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे, आणि बऱ्यापैकी आपण यात यशस्वी देखील होत आहोत. आपला देश आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर आहे आणि वर्ष 2047 पर्यंत संपूर्णपणे सक्षम बनायचं आहे.