Digital Gold : या दिवाळीत काही नवीन करा, खरेदी करा डिजिटल गोल्ड

Digital Gold : दिवाळी जवळ येऊन ठेपली आहे म्हणजे सोन्या चांदीच्या वस्तूंबद्दल काही तरी विचार केलाच असेल तुम्ही. आता बाजारात सोन्याचे भाव कमी होण्याच्या चर्चा सुरु आहेत, आणि धनत्रयोदशीचा दिवस यांच्या खरेदी साठी एकदम उपयुक्त ठरतो पण याबद्दल अजूनही विचार करत असाल तर घाबरू नका, आज आम्ही काही सोपे पर्याय सुचवणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही अगदी सहज सोन्याची खरेदी करू शकता. यासाठी न तुम्हाला कोणत्याही दुकानात जाण्याची गरज आहे किंवा न कुठल्या विशिष्ठ एपची गरज नाही. मग जास्ती वेळ न घालवता ताबडतोब या बद्दल जाणून घ्या आणि खरेदी सुरु करा.

१) पेटीएम(PayTM):

डिजिटल जमान्यात जगात असताना बाहेर जाऊन खस्ताखाण्याची गरज नाही. पेटीएम सारख्या मोबाईल एपचा वापर करून तुम्ही घरबसल्या 99.9 टक्के शुद्ध सोन्याची खरेदी करू शकता.MMTC-PAMP यांच्यासोबत एकत्र येऊन पेटीएम हि सेवा देऊ करत आहे. तुम्ही कमीत कमी म्हणजे 10 रुपयांत इथे सोन्याची खरेदी करू शकता.

२)गुगल-पे (Google-Pay): Digital Gold

हे एप देखील इतर डिजिटल एप्स प्रमाणे काम करेल, त्यामुळे जर का तुम्ही गुगल पेचा वापर करत असाल तर तर इथे तुम्ही 24 केरेट सोन्याची खरेदी करू शकता.हे सोनं खरेदी केल्यानंतर एका लॉकरमध्ये राहील, गरजेप्रमाणे तुम्ही एपवरच तुम्ही तयची विक्री करू शकता.

३) फोन-पे( Phone-Pay):

इथे डिजिटली सोन्याची खरेदी करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत जसे कि MMTC-PAMP, सेफ्गोलडआणि Caratlane. सोनं विकत घेल्यानंतर त्याची फिजिकल डिलिवरी देखील मिळवता येते तसेच फोन-पेवर कॅशबेक मिळवता येतो.

डिजिटली सोन्याची(Digital Gold) खरेदी करण्याचा फायदा म्हणजे इथे सोन्याच्या घडवणूकीची किंमत लावली जात नाही.त्यामुळे बाजरी किमतीच्या तुलनेत तुम्हाला कमी पैश्यात तेवढेच सोनं विकत घेता येतं. या दिवाळीत काही तरी नवीन करून पहा आणि डिजिटली सोन्याची खरेदी करा.