Digital Loan : आता बँकेत न जाता मिळवा कर्ज; कसे ते पहाच

बिझनेसनामा ऑनलाईन । हल्ली आपण Digital जगात वावरतो. गाडी बुक करणे, खायला काही मागवणे किंवा कोणाला पैसे पाठवणे असो, Digitally सगळ्याच गोष्टी सोप्या आणि ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कुठेही बाहेर न पडता घर बसल्या आपण अनेक कामे करू शकतो. आधी एखादं काम करायचं म्हंटल तर सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या किमान दहा वेळा चढाव्याच लागायच्या. पण डिजिटल जगात या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. काही बटनांच्या मदतीनेच तुम्ही सर्व कामं घर बसल्या करू शकता. आत्ता तर घरबसल्या बँकेकडून कर्ज (Digital Loan) सुद्धा घेऊ शकता. खरं वाटतं नाही ना? पण हे शक्य आहे. कसे ते जाणून घेऊया .

Digital Loan काय आहे?

आता घर बसल्या कर्ज घेणं सोपं झालं आहे. अनेक बँका व आर्थिक संस्था आपल्या ग्राहकांसाठी या सुविधा उपलब्ध करवून देत आहे. तर Digital Loan म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास कुठल्याही बँक किंवा आर्थिक संस्थेकडून ऑनलाईन लोन घेणं आणि त्याची परतफेड देखील ऑनलाईन पद्धतीने करणं म्हणजेच डिजिटल लोन होय. इथे तुम्हाला त्या बँक मध्ये जाण्याची गरज नसते. हे एका प्रकारचे पर्सनल लोन आहे, जिथे मोबाईल App किंवा Digital platform चा वापर करता येतो.

डिजिटल लोन कसं मिळवाल?

यासाठी सर्वात आधी Digital loan तुम्हाला नेमकं कुणाकडून घ्यायचं आहे ठरवा. यानंतर सदर बँक किंवा आर्थिक संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही विषय संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता. या बँक किंवा संस्थेच्या साईटवर जाऊन तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी आधी अर्ज करावा लागतो. अर्ज करताना तुमचं नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, पेन कार्ड नंबर, बँक खात्याबाबत संपूर्ण माहिती द्यावी लागेल. याशिवाय महत्वाचे दस्तऐवज जमा करणं सुद्धा आवश्यक असते. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळंच काम डिजिटल होत असल्याने डिजिटल सही महत्वाची ठरते.

Digital Loan चे फायदे काय व ते किती सुरक्षित आहे?

जर का तुम्ही अधिकृत बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेत असाल तर ते नक्कीच सुरक्षित आहे. कर्ज घेतान आपण नक्की Official Site पाहत आहोत ना हे तपासून घ्या. तसेच हे कर्ज अधिकृत साईट किंवा मोबाईल एप वरूनच घ्या. काही लोकं इतरांना फसवण्यासाठी खोट्या साईट्सचा वापर करत असतात, त्यामुळे अश्या धोक्यांपासून सावध राहा.

फायदे काय :

डिजिटल लोन मुळे वेळेची फार बचत होते.

कर्ज घेण्याची प्रक्रिया फारच सोपी असते त्यामुळे डोक्याला झंझट नाही.

कर्ज लगेचच मान्य केलं जातं.