Digital Nomads म्हणजे कोण असतात? भटकंती करून कसा पैसा कमवतात?

Digital Nomads : तुम्हाला माहिती आहे का, जर‌ का तुम्हाला फिरायची आणि नवनवीन जागा बघायची आवड असेल तर याद्वारे भरपूर प्रमाणात पैसा कमावता येतो.‌ अशा लोकांना डिजिटल नोमेड म्हणून ओळखलं जातं. ही लोकं काय करतात तर देश विदेशात हिंडतात आणि फिरतात, आणि अश्या भटक्या जीवनातच ते लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर करून पैसे कमावतात. तुम्ही जर का ये जवानी है दिवानी सारखे चित्रपट पाहिले असतील तर हे आयुष्य कसं असेल याचं चित्र थोडंफार रंगवलं जाऊ शकतं. हे व्यक्ती नक्की कसे असतात हे आज जाणून घेऊया..

असं म्हणतात की स्टीव्हन के. रॉबर्ट्स हे जगातील पहिले डिजिटल भटके होते. 1983 ते 1991 या काळात त्यांनी संपूर्ण अमेरिकेत सायकलवरून सुमारे दहा हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. या भटकंती प्रेमींचा जागतिक अर्थव्यवस्थेत 787 अब्ज डॉलर्सचे योगदान‌ आहे. जगात जसजसा डिजिटल भटक्यांचा ट्रेंड वाढू लागला तसतसे त्याच्याशी संबंधित व्यवसायही वाढू लागले.

इतर देशांप्रमाणे भारतातही प्रमाणात वाढ: Digital Nomads

भारतातही डिजिटल भटक्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भारतीयांचा याकडे वळतात इतकंच नाही तर जगभरातील डिजिटल भटक्यांसाठी भारत एक आवडीचे ठिकाण बनत आहे. दिवसेंदिवस इथे भटकंती प्रेमींची संख्या वाढल्यामुळे आपल्या देशाची ख्याती जगभर पसरत आहे. आपल्या देशातील इंटरनेट सेवा आता बरीच सुधारली असल्यामुळे या व्यवसायात भर पडली आहे.भारतात आणि जगात तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. जगातील इतर देशांपेक्षा भारतात इंटरनेट सुविधा चांगल्या आहेत. उदाहरणार्थ, झूम किंवा गुगल मीट आणि नवीन टूल्सचा वापर करता येतो. आणि म्हणूनच भटकंती प्रेमीं‌ इथे फ्रिलांसिंग किंवा इतर ऑनलाईन व्यवसाय सुरू करु शकतात. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात या भटकंती प्रेमींचा (Digital Nomads ) आकडा अधिक वाढणार आहे