Direct Tax Collection : देशाच्या अर्थ मंत्रालयाकडून एक खास माहिती माध्यमांसोबत शेअर करण्यात आली. ज्यात अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात सरकारी खजिन्यात अधिकाधिक करप्राप्तीमुळे वाढ झाल्याची माहिती दिली. सरकार तसेच अर्थ मंत्रालय जनतेच्या सहकार्यामुळे खुश आहेत. अर्ध मंत्रालयाने सादर केलेले आकडे सांगतात की चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत सरकाच्या प्रत्यक्ष कराच्या कमाईमध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली असून हा आकडा 14.50 लाख कोटी रुपयांच्या ही पुढे निघून गेला आहे. तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीसी (CBDC) यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2023-24 या कार्यकाळात 14.71 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा करण्यात आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 19.55 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
प्रत्यक्ष करामुळे मुळे सरकारची तिजोरी भरली : (Direct Tax Collection)
एक एप्रिल पासून देशात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते, म्हणजेच सध्या आपण आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटच्या काही दिवसांमध्ये वावरत आहोत. या काळात प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात अधिकाधिक वाढ झाल्याची बातमी ही संतोषजनक आहे. सीबीडीसी (CBDC) च्या माहितीनुसार आत्तापर्यंत प्रत्यक्ष कारमधून झालेली कमाई ही मागच्या अर्थसंकल्पात ठरवल्या गेलेल्या अंदाजांशी मिळती जुळती आहे. सरकारने या चालू आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष करामधू होणाऱ्या कमाईचा अंदाज 18.23 लाख कोटी रुपये असा लावला होता.
प्रत्यक्ष कर (Direct Tax) म्हणजे काय?
नावाप्रमाणेच जो कर आपण सरकारला प्रत्यक्षपणे देऊ करतो त्याला प्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. डायरेक्ट टॅक्स हा कर एखादी व्यक्ती किंवा संस्था थेट सरकारकडे जमा करत असते. उदाहरणांमध्ये आयकर (Income Tax), स्थावर मालमत्ता कर (Real Property Tax), वैयक्तिक मालमत्ता कर ( Personal Property Tax,) इत्यादींचा समावेश होतो, हे सर्व प्रकारचे कर वैयक्तिक करदात्याद्वारे थेट सरकारला दिले जातात (Direct Tax Collection). यंदाच्या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट इन्कम टॅक्स चे ग्रॉस कलेक्शन 19.72 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच वार्षिक आधारे पर्सनल इन्कम टॅक्स चे ग्रॉस कलेक्शन 30.46 टक्क्यांनी वाढलेले आहे. सीबीडीसी (CBDC)च्या आकड्यानुसार कॉर्पोरेट इन्कम टॅक्स मध्ये यंदा 18.33 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.