Disney + Hotstar करणार अंबानींसोबत डील? इतरांसाठी धोक्याची घंटा…

बिझनेसनामा ऑनलाईन । प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा व्यवसाय देशातील सर्वात मोठा आहे याबद्दल कुणालाही दुमत नसेल. जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी बजावत अंबानी आपली वाटचाल करत असून आणि आता ते OTT च्या क्षेत्रात मोठा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहे. अंबानी जगातील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन स्टुडिओपैकी एक असलेल्या वॉल्ट डिस्नेचा भारतीय उद्योग विकत घेणार आहेत. आपण या व्यवसायाला सोप्या शब्दात Disney + Hotstar म्हणून ओळखतो आणि सध्या चालेल्या विश्व चषकामुळे Disney + Hotstar जोरदार चर्चेत आहे.

अंबानी आणि Disney + Hotstar येणार एकत्र:

अंबानी आणि Disney + Hotstar यांच्यात जर का करार झाला तर काही काळात हॉटस्टार आणि जिओ सिनेमा यांचे एकत्रीकरण होईल. दोन्ही कंपन्या एकमेकांमध्ये सामावल्या जातील. Disney हि अमेरिकेतील कंपनी आहे आणि भारतीय बाजारात ती गेल्या अनेक दिवसांपासून अनेक आव्हानांना तोंड देत आहे. अश्या कठीण काळात त्यांना भारतातून कुणाचा तरी खंबीर आधार पाहिजे होता आणि ते एका पार्टनरच्या शोधात होते आणि कदाचित आता अंबानीच ते पार्टनर असतील.

हा करार झाल्याने अंबानींना फायदा कसा?

हा करार जर का यशस्वी या एकत्रित संस्थेकडे 115 टीव्ही चॅनेल (स्टार इंडिया – 77 आणि वायकॉम18 – 38) आणि यावर Disney + Hotstar आणि जिओ सिनेमा यांची मालकी असेल. डिस्ने आणि अंबानी हा करार रोख रुपये आणि शेअर्सच्या रुपात करतील. आणि यानंतर मुकेश अंबानी हे देशातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्कचे मालक बनतील. डिस्ने अनेक दिवसांपासून भारतात आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असताना हा करार जर का झाला तर बाकी कंपन्यांसाठी हि धोक्याची घंटा ठरू शकते.