Diwali 2023: आपल्या देशातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, आणि हा सण फक्त एका दिवसावर येऊन ठेपला आणि आणि सोबतच आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. यंदाच्या धनत्रयोदशीला आपल्याला 50 हजार कोटी रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण चीनसारख्या देशाच्या वस्तू खरेदी करून त्यांना भरपूर आर्थिक फायदा करवून दिला होता मात्र यंदा वारं वेगळ्या दिशेने वाहताना दिसत आहे, व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला बराच उत आलेला असल्याने स्थानिक व्यापार वाढला आहे..
यंदा फक्त व्होकल फॉर लोकल : Diwali 2023
सर्वात मोठा आणि देशभरात साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2023) आणि यंदा खरोखरच आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हि दिवाळी आनंद घेऊन येणार आहे. अनेक वर्षांपासून आपण भली मोठी रक्कम चीनी वस्तूंवर खर्च केली आहे, मात्र यंदा आपण या प्रकारावर आळा घातला आहे आणि आपल्या व्यापाऱ्यांना फायदा करून देत 50 हजार कोटी रुपये एवढी मोठी रक्कम देशाबाहेर जाण्यापासून वाचवली आहे.
देशभरातील व्यापाऱ्यांनी दिवाळीची जोरदार तयारी केली आहे. आणि चीनी मालाऐवजी मोठ्या प्रमाणात भारतीय वस्तू विकल्या जात आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी या संदर्भात माहिती देत याला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील किरकोळ व्यापार सुमारे 50 हजार कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. या दिवाळीत व्होकल फॉर लोकलचा मोठ्या प्रमाणात प्रभाव बाजारावर दिसून येत आहे, आणि म्हणूंच हि दिवाळी (Diwali 2023) आपल्यासाठी शुभ ठरणार आहे हे नक्की…