Diwali Budget Plan : कमी खर्चात दिवाळी साजरी करायची? मग ‘या’ गोष्टींचे पालन कराच

Diwali Budget Plan : दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचं समजला जातो. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात अनेक जण आनंदाने आपल्या परिवारासोबत आणि जवळच्या मित्रांसोबत हा सण साजरा करत असतात. आपल्याकडे अनेक लोकं अजूनही मध्यमवर्गीय कुटुंबांचा भाग आहेत आणि कितीही इच्छा असली तरी त्यांना सणांच्या वेळी आपला आर्थिक व्यवहार कोलमडून जाईल का अशी भीती असते, कारण सण म्हटलं की नवीन कपडे, नवीन वस्तू या खरेदी करून घरात आणल्या जातात आणि घरातील कमावत्या माणसाला खर्चाच्या चिंतेमुळे अस्वस्थता सोसावी लागते. मात्र तुम्हाला घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण आज आम्ही पैशांचे नियोजन कसे करता येईल आणि कमी खर्चात दिवाळी साजरी कशी करायची याबाबत काही टिप्स देणार आहोत.

१) आपली गरज ओळखा-

जास्तीत जास्त पैसे जर का वाचवायचे असतील तर सर्वात आधी आपल्याला आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत याची माहिती करून घेतली पाहिजे. सर्वात आधी काय करावे तर अशा गोष्टी विकत घ्याव्यात ज्याने तुमच्या गरजा भागवल्या जातील, नंतर जर का नियोजना बाहेर (Diwali Budget Plan) काही पैसे शिल्लक राहिलेच तर नक्कीच तुम्ही अजून जास्त खर्च करू शकता. पण जेव्हा एखादा माणूस आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन खर्च करतो तेव्हा साहजिकपणे त्याचा ताण येणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच अशा खर्चापासून दूर राहा.

२) पैशांचे नियोजन करा: Diwali Budget Plan

नियोजनाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य करणे हे सोपं नाही. आणि पैसा ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे पैशांचे नियोजन हे प्रत्येक माणसाने केलंच पाहिजे. कधीही शेवटच्या क्षणापर्यंत खरेदी लांबवत ठेऊ नका, शेवटच्या क्षणाला जर का तुम्ही खरेदी करण्याच्या मागे लागलात नक्कीच हे तुमच्यासाठी डोकेदुखी होऊन बसेल. आणि मग सांगेल त्या किमतीत वस्तू विकत घ्यावी लागेल.

३) ऑफर्स पाहा:

सणांच्या वेळी अनेक कंपन्या, ऑनलाइन शॉपिंग साइटवर विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सूट उपलब्ध करून देत असतात. अनेक आवश्यक आणि गरजू वस्तूवर इथे भली मोठी सूट दिली जाते. या सर्व गोष्टींची माहिती मिळवा, दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या गेलेल्या किमती या एकमेकांसोबत तपासून पहा, तुम्ही पाहत असलेल्या वेबसाईट या योग्य आहेत ना याची खात्री करून घ्या नंतरच खरेदी करण्याचा विचार करा.

४) दुसऱ्यांशी तुलना करू नका:

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे जास्त पैसा खर्च करण्यावर भर देतात. त्यामते आपण जेवढा जास्त पैसा खर्च करतो जास्त आपली प्रतिष्ठाही इतरांसमोर वाढत असते. पण यात काहीच तथ्य नाही. तुम्हाला कुणालाही इम्प्रेस करायचे नाही आहे, लक्षात घ्या की प्रत्येक माणूस हा पैशांची वेगवेगळी रक्कम कमवत असतो प्रत्येकाच्या गरजा या वेगळ्या असतात त्यामुळे इतरांकडे पाहत आपला खर्च वाढवण्याची काहीही गरज नाही.

सणांचा काळ हा आपल्या परिवारासोबत आपल्या जवळच्या माणसांसोबत आनंदात घालवण्याचा असतो. मोठमोठे खर्च करून किंवा इतरांना दाखवण्यासाठी ते बनलेले नाहीत . त्यामुळे अवाढव्य खर्च टाळत सुद्धा दिवाळी सारखा सण अगदी आनंदाने साजरा केला जाऊ शकतो हे कायम लक्षात ठेवा आणि कुठलाही ताण न घेता सणाचा (Diwali Budget Plan) आनंद घ्या.