Diwali Muhurat Trading : व्यापारी जगासाठी दिवाळीत सर्वात महत्वाचा काळ म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग, आपण जसं लक्ष्मी पूजन करून येणाऱ्या काळासाठी ऐश्वर्याची मागणी करतो आणि आत्तापर्यंत दिलेल्या मदतीसाठी आभार मानतो त्याच प्रमाणे देशात मुहूर्त ट्रेडिंग महत्व आहे. आजही व्यापारी जगात अशी समजूत आहे कि मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी नवीन गुंतवणूक केल्याने वर्षभर व्यापारात तेजी यायला आणि भरगोस नफा कमवायला मदत होते. आधी म्हटल्या प्रमाणे हा मान्यतेचा आणि श्रद्धेचा भाग आहे. आपण कितीही पुढारलेलो असलो तरीही आजही आपल्या मनात असलेली श्रद्धा पुन्हा एकदा जुन्या परंपरांकडे घेऊन येतेच.
आत्तापर्यंत आपण मुहूर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat Trading) म्हणजे काय असत, मुहूर्त ट्रेडिंग कधी व का केलं जातं याबद्दल पुरेशी माहिती घेतलेली आहे म्हणूनच आज पाहूयात मुहूर्त ट्रेडिंग करण्याचे फायदे कोणते असतात. जसं कि तुम्हाला माहितीच असेल कि BSE आणि NSE या स्टोक बाजारातील दोन महत्वाच्या कंपन्यांकडून दिवाळीच्या दिवशी बाजार बंद असूनही पुन्हा काही काळासाठी तो पुन्हा एकदा खुला केला जातो. भारतीय बाजारात अनेक वर्षापासून चालत आलेली हि परंपरा आहे आणि येणाऱ्या अनेक काळासाठी हि परंपरा कायम राहणार आहे.
मुहूर्त ट्रेडिंग करण्याचे फायदे कोणते? (Diwali Muhurat Trading)
मुहूर्त ट्रेडिंगला व्यापारी जगात आर्थिक वर्षाची एक नवीन सुरुवात म्हणून बघितलं जात, याला सोप्या भाषेत आपण व्यापारी जगातला गुढी पाडवा म्हटलं तरीही ते चुकीचं ठरणार नाही. या दिवशी केलेली गुंतवणूक हि शुभ मानली जाते आणि यामुळे येणाऱ्या काळात भरपूर नफा कमावण्यात मदत होते अशी एक संकल्पना चालत आली आहे. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सहभागी झाल्यामुळे व्यापाऱ्यांच्या मनात एक सकारात्मक इच्छा तयार व्हायला मदत होते कारण कुठेतरी याचा संबंध आपल्या मनाशी असतो. आपली ,मनाला काम करत राहण्यासाठी एका विश्वासाठी आणि आधाराची गरज असते कि हे केल्याने आजूबाजूच्या कुठल्याही वाईट परिस्थितीचा परिणाम आपल्यावर होणार नाही आणि तोच विश्वास इथून व्यापाऱ्यांना मिळतो.
मुहूर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat Trading) हि एक सकारात्मक सुरुवात असल्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षात तीच उर्जा कायम राहण्यासाठी मदत होते. आपण भरपूर नफा कमवू शकतो असा विश्वास निर्माण होतो. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग हे फार कमी काळासाठी चालत असल्यामुळे यात अस्थिरतेचं प्रमाण कमी असत आणि म्हणूनच याची सुरक्षित वातावरण निर्मिती व्हायला मदत होते. एकंदरीत काय तर व्यापाराच्या मनात सकारात्मकता जागृत होण्यासाठी मुहूर्त ट्रेडिंग फारच महत्वाचं आहे.