Diwali Muhurat Trading : यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंगची शुभ वेळ कोणती? कसा होतो व्यापार?

Diwali Muhurat Trading : यापूर्वीच्या लेखात आपण मुहूर्त ट्रेडिंग बद्दल थोडक्यात माहिती घेतली. मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय आणि त्यामागे असलेला इतिहास थोडक्यात उलघडून पहिला. आता याबद्दल अजून थोडी माहिती जाणून घेऊया. मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान नेमकं काय होतं हे पाहूयात. या दरम्यान,NSE (National Stock Exchange) आणि BSE (Bombay Stock Exchange) या दोन्ही कंपन्या काही मर्यादित काळासाठी व्यापार करायची परवानगी देतात. म्हणजे नेमकं काय ते जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा..

मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ काय आणि यावेळी व्यापार कसा होतो? Diwali Muhurat Trading

आधी म्हटल्या प्रमाणे दिवाळीच्या या काळात NSE आणि BSE या दोन्ही कंपन्या काही वेळासाठी व्यापार करण्याची परवानगी दिली जाते. मुहूर्त ट्रेडिंग करण्याचा एक वेळ ठरलेला असतो आणि या वेळेचे महत्व फार आहे. यावर्षी 12 नोव्हेंबर 2023 हा दिवस मुहूर्त ट्रेडिंग करण्यासाठी ठरवण्यात आला आहे आणि याची वेळ हि 6:15 PM – 7:15 PM IST अशी असणार आहे . BSE आणि NSE यांच्याकडून व्यापाराचे पाच वेगळे प्रकार तयार केले जातात, जसे कि Block Deal Session, Pre open Session ,Normal Market Session, Call Auction Session आणि Closing Session.

यांचा अर्थ काय हे आज थोडक्यात जाणून घेऊया.

१) Block Deal Session: दोन पक्ष एका निश्चित किंमतीवर सिक्युरिटीची खरेदी किवा विक्री करण्यास सहमती देतात (Diwali Muhurat Trading) आणि स्टॉक एक्सचेंजला त्याबद्दल माहिती दिली जाते.

२) Pre open Session: इथे स्टॉक एक्सचेंकडून समतोल साधण्यासाठी सुमारे आठ मिनिटांसाठी एक किंमत ठरवली जाते. (6:00 PM – 6:08 PM IST)

३) Normal Market Session: हे एका तसाचे सत्र आहे जिथे सर्वाधिक व्यापार केला जातो.

४) Call Auction Session: इथे लिक्विड सिक्युरिटीजचा व्यापार केला जातो. जर एक्स्चेंजने ठरवलेल्या निकषांची पूर्तता केली तर सिक्युरिटीजचे रुपांतर इलिक्विडमध्ये केलं जातं.

५) Closing Session: इथे व्यापारी आणि गुंतवणूकदार व्यापाराच्या किमती बंद झाल्यानंतर मार्केट ऑर्डर देतात. (7:40 PM IST)