Diwali Muhurat Trading : भावनिक निर्णय घेऊ नका आणि नुकसान होण्यापासून सावध राहा

Diwali Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे व्यापारी वर्गाची दिवाळी. आपण कसं या दिवशी एकत्र येऊन फराळ करतो, सुखाची आनंदाची देवाण-घेवाण करतो, त्याचप्रमाणे व्यापारी समुदाय मुहूर्त ट्रेडिंगचं अवचीत्य साधून एकत्र येतात आणि शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात. आत्तापर्यंत तुम्हाला या दिवसाचं महत्व अगदीच कळलं असेल, पण मुहूर्त ट्रेडिंग करताना काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्ष्यात ठेवल्या पाहिजेत, यांबद्दल माहिती आहे का? नसेल तरीही हरकत नाही आज जाणून घेऊया मुहूर्त ट्रेडिंग करताना अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या अनवधानाने बाजूला सारल्या जातात, आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि या शुभ दिवसाची चांगली सुरुवात करा…

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये भाग घ्यावा का? (Diwali Muhurat Trading)

बाजारात नवखा असलेला माणूस याच प्रश्नावर गोंधळून जातो. त्यामुळे सर्वात आधी लक्ष्यात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या दिवसाला पारंपारिक महत्व आहे, त्यामुळे तुम्ही जर का रूढी आणि परंपरांना मान्यता देत असाल तर मुहूर्त ट्रेडिंग मधून तुम्हाला मानसिक आणि भावनिक फायदा होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अगदीच अल्पावधीसाठी उघडलेल्या या बाजारात व्यापाराची तेजीने वाढ होते त्यामुळे आकर्षक व्यापार करण्याची हि एक उत्तम संधी आहे. या दिवसाला भावनिक आधार असला तरीही नफ्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही, तरीही तुम्ही जर का नीट परिस्थती समजून घेत व्यापार करू शकत असाल तरच हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

मुहूर्त ट्रेडिंग करण्याआधी या गोष्टी नक्की तपासून घ्या:

वर म्हटल्या प्रमाणे मुहूर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat Trading) सोबत आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात, मनात विश्वास असतो कि इथून गुंतवणूक सुरु केल्यास नक्कीच नफा कमावता येईल पण पूर्णपणे विवेकबुद्धीला विसरून कधीच व्यापारात उतरता येत नाही, भावनिक आधार आणि बुद्धीची साथ यांची नीट सांगड घालता आली तरच उत्तम फायदा करवून घेता येतो. इतर बाजरी परिस्थती प्रमाणे अडथळे इथेही येतील, चांगली सुरुवात आणि शुभ वेळ म्हणून काही त्या टाळता येणार नाहीत. म्हणूनच या बाजारात उतरताना येऊ शकणाऱ्या अडथळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करा, स्वतःच्या काही युक्त्या तयार ठेवा.

तुम्हाला कुठल्या स्टोक्समध्ये गुंतवणूक करायची आहे, जास्तीत जास्त फायद हा कुठे गुंतवणूक केल्याने होऊ शकतो याची माहिती सुरुवातीलाच असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावनिक आधारावर कोणताही निर्णय घेऊ नका, वेळ शुभ असली (Diwali Muhurat Trading) तरीही देव आपली स्वतः येऊन मदत करणार नसतो, त्यामुळे विचारी चाल खेळा आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घेण्यासाठी तयार राहा.