Diwali Muhurat Trading : दिवाळी म्हटली कि बाजारात एकाच गोष्टीची जोरदार चर्चा सुरु होते, ती म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगची. आपण आत्तापर्यंत याचा अर्थ आणि हे ट्रेडिंग कधी व का केलं जातं याची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतली होती. जग कितीही बदलेलं असलं तरीही काही रूढी आणि परंपरांना आपण कधीच विसरू शकत नाही किंवा पूर्णपणे मागे टाकू शकत नाही. मुहूर्त ट्रेडिंग हा त्यातलाच एक प्रकार आहे. आज व्यवसायाची व्याख्या बदलली आहे, व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत तरीही आपला विश्वास नेहमीच आपल्याला पुन्हा एकदा मुळापाशी घेऊन येतो. आज जाणून घेऊया मुहूर्त ट्रेडिंग का करावं याबद्दल अगदी थोडक्यात पण महत्वाचं असं सारं काही…
का करावं मुहूर्त ट्रेडिंग? (Diwali Muhurat Trading)
आधी म्हटल्याप्रमाणे हि एक शुभ वेळ आहे, मुहूर्त म्हणजे कोणतही महत्वाचं काम करण्याची एक शुभ वेळ. आपली अशी मान्यता असते कि या शुभ वेळेत ते काम पूर्ण केल्यानंतर त्यात यश नक्कीच मिळेल. दिवाळीच्या दिवसांत जरी स्टोक बाजार बंद असला तरीही मुद्दामून या तास दोन तासांसाठी तो पुन्हा खुला केला जातो आणि मग इथे मोठ मोठ्या गुंतवणुका केल्या जातात, काही शेअर्सची खरेदी होते तर काहींची विक्री केली जाते.
उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी देशात यंदाच्या वर्षीचं मुहूर्त ट्रेडिंग केलं जाईल, दीड तासांची हि प्रक्रिया संध्याकाळी 6 वाजता सुरु होऊन 7:15 पर्यन्त हा व्यापार केला जाईल. इथे गुंतवणूक करणाऱ्या प्रक्तेक व्यापाऱ्याला विश्वास असतो कि जर का या मुहूर्तापासून व्यवसायाची सुरुवात केली तर वर्षभर व्यवसाय सुरळीत चालेल, भरपूर नफा कमावला जाईल, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात शेअर्सची विक्री झालेली दरम्यान पाहायला मिळते.
मुहूर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat Trading) हा एक विश्वासाचा भाग आहे. त्यामुळे जुने असो व नवीन, प्रत्येक व्यापारी काही प्रमाणात इथे सामील होऊ पाहतो. तुम्हाला जर का नवीन गुंतवणुकीपासून सुरुवात करायची असेल भारतीय बाजारात या शिवाय दुसरा चांगला दिवस मानला जात नाही. काही व्यापारी बजारात आपले शेअर्स विकतात तर बाकी इच्छुक लोकं त्यांची खरेदी करतात, यामुळे शेअर बाजारत अविरत सुरु राहायला मदत होते. नवीन गुंतवणूक करणारा माणूस येणाऱ्या काळात भरपूर फायदा व्हावा म्हणून या दिवसाला महत्व देतो तर जुने गुंतवणूकदार आधीपेक्षा अजून जास्ती नफा मिळावा म्हणून प्रार्थना करतो, मुहूर्त ट्रेडिंग हि भारतीय बाजाराची आज पर्यानात चालत आलेली परंपरा आहे आणि यात अनेवेळा कितीतरी गुंतवणूकदारांना काही क्षणातच 1 लाख रुपयांचा देखील फायदा झाला आहे.