Diwali Muhurat Trading : दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्यात का?

Diwali Muhurat Trading : उद्या देशभरात दिवाळी साजरी केली जाईल, दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. आयुष्यात असलेल्या दुख आणि चिंतांना मागे सरत दिव्यांच्या रोषणाईत नवीन सुरुवात करण्याचा दिवस. आणि या दिवसाची अजून एक खासियत म्हणजेच मुहूर्त ट्रेडिंग. सामान्य जनतेसाठी जसा हा दिवस महत्वाचा असतो, तसेच या दिवसाचे महत्व व्यापारी बाजारातही आहे. गेल्या आर्थिक वर्षात कितीही नुकसान झाले असले, व्यवसाय विसकटला असला तरीही एका नवीन उर्जेने आणि आत्मविश्वासाने या दिवसापासून एका नवीन सुरुवात केली जाते. प्रत्येकालाच आपल्या कामात सतत कार्यरत राहण्यासाठी एक प्रकारच्या विश्वासाची आणि सकारात्मक उर्जेची गरज असते, आणि म्हणूनच व्यापारी जगात मुहूर्त ट्रेडिंगचं महत्व अधिक आहे.

आधी म्हटल्या प्रमाणे BSE आणि NSE या देशातील दोन्ही मोठमोठ्या स्टोक एक्सचेंज कंपन्या साधारण एका तासासाठी शेअर बाजार पुन्हा सुरु करतात आणि मग अनेक व्यापारी एकत्र येऊन व्यवसायाची नवीन दारं उघडतात. अगदी सोप्या शब्दात मुहूर्त ट्रेडिंगचं (Diwali Muhurat Trading) महत्व सांगायचं झाल्यास, जसं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीची पूजा करून करतो, त्याच प्रमाणे व्यवसायाची नवीन सुरुवात हे व्यापारी मुहूर्त ट्रेडिंगपासून करतात. या दिवसासोबत त्यांची श्रद्धा आणि विश्वास जोडलेला असतो आणि मागची सगळी संकटं आणि अडथळे विसरून पुन्हा खंबीरपणे उभं राहायला हा एक तास फारच महत्वाचा ठरतो.

आज जाणून घेऊया मुहूर्त ट्रेडिंगचा भाग बनण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत: (Diwali Muhurat Trading)

१) बाजारी परिस्थितींचा अभ्यास करा:

कुठेही गुंतवणूक करण्याआधी आपल्याजवळ बाजारातली परिस्थती नेमकी कशी आहे याची संपूर्ण माहिती असावी. कुठल्या स्टोक्समध्ये येणाऱ्या काळात प्रगती करण्याची क्षमता आहे याचा विचार करा, तुमची गुंतवणूक कुठे सफल होऊ शकते याच नीट विचार करून पाऊल उचला. गरज वाटत असल्यास तुम्ही एखाद्या जाणकाराची मदत घेऊ शकता.

२) गुंतवणुकीचा प्लॅन तयार करा:

कुठलीही क्रिया करताना आधी त्याचा आराखडा तयार असावा. आराखडा तयार असल्याने काय होतं, कि आपण कुठे चुकतोय,आपल्याला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे इत्यादी महत्वाच्या मुद्यांची नोंद ठेवता येते. यामुळे येणारे अडथळे दूर ठेवता येतात.

३) ब्लू चिप्स स्टोक्स ओळखा:

ब्लू चिप्स स्टोक्स कोणते, तर ज्या कंपन्या उत्तम दर्ज्याचे काम करत आहेत आणि त्यांचे स्टोक्स देखील चांगले प्रदर्शन करतात. भविष्याच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास या स्टोक्समध्ये केलेली गुंतवणूक हि जास्ती सुरक्षित मानली जाते.

४) डिमेट अकाऊट उघडा:

स्टॉक बाजारात जर का गुंतवणूक करायची असेल तर डिमेट अकाऊट असणे अनिवार्य आहे. या अकाऊट मध्ये तुमच्या जवळ असलेल्या शेअर्सची नोंद ठेवली जाते, ज्याच्या वापर करून अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही स्वतःची बाजरी स्थती तपासून घेऊ शकता. बजाज फायनान्स हि एक उत्तम कंपनी आहे जिचा वापर करून तुम्ही डिमेट अकाऊट उघडू शकता.