Diwali Muhurat Trading : देशातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखली जाणारी दिवाळी तोंडावर आली असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी हा हिंदू परिवारांमध्ये दिवाळीचं महत्व फार आहे. दरवर्षी हा सण तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या केलेल्या पराभवाचं चिन्ह आहे, जो कि आपण दिव्यांच्या प्रकाशात घर आणि आजूबाजूचा परिसर उजळवून साजरा करतो. कोणत्याही इतर धार्मिक सणांप्रमाणेच दिवाळी सणाबद्दल श्रद्धा, प्रथा आणि परंपरा विपुल आहेत. यातीलच एक परंपरा म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग. याबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहेत का? नसेल तर काळजी करू नका कारण आज आपण याबद्दल चर्चा करणार आहोत..
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? (Diwali Muhurat Trading)
मुहूर्त म्हणजे काय? तर एक शुभ काळ. या वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही लग्नाचा किंवा मुंजीचा मुहूर्त ऐकलंच असेल. हा मुहूर्त चुकला तर बराच मोठा त्रास होऊ शकतो अशी आपली समजूत असते त्यामुळे सहजासहजी आपण तो चुकवत नाही. शास्त्रानुसार आकाशात जेव्हा सर्व ग्रह जेव्हा एका ओळीत येऊन बसतात तेव्हा त्याला शुभ मुहूर्त म्हणून ग्राह्य धरलं जातं.
अनेक लोकांकडून या वेळेचं काटेकोरपणे पालन केलं जातं. दिवाळीच्या दिवशी शुभ म्हणून ठरलेल्या या एका तासात अनेक आर्थिक घडामोडींना चालना दिली जाते. तुम्ही जर का कधी वाचलं किंवा ऐकलं असेल तर यावेळी अनेक स्टोक्समध्ये गुंतवणूक केली जाते (Diwali Muhurat Trading) किंवा अनेक शेअर्स विकत घेतले जातात. दिवाळीच्या संध्याकाळी आणि लक्ष्मी पूजनाच्यावेळी या प्रकारांना चालना मिळते कारण अनेक वर्षांपासून लक्ष्मीला आपण धनाची देवता म्हणून तिचे पूजन करत आलो आहोत
मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास:
जुन्या काळात स्टॉक ब्रोकर्स दिवाळीच्या पवित्र दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात करत असत. त्यांच्या नवीन ग्राहकांसोबत होणारा व्यवहार इथूनच सुरु व्हायचा. या दरम्यान व्यवहाराच्या संबंधित पुस्तकाचे पूजन केले जायचे ज्याला चोपडा पूजन असे म्हणतात. कुणा एकेकाळी म्हारवाडी व्यापार्यांकडून या काळात व्यवसायाचे स्टोक्स विकले जायचे कारण त्यांची अशी मान्यता होती कि दिवाळीच्या काळात घारण पैसे येऊ नयेत, आणि दुसऱ्या बाजूला गुजराती व्यापारी मुद्दामून याच काळात नवीन व्यवहाराला सुरुवात करत असत. मात्र यात किती तथ्य आहे हे सांगता येत नाही. आजकाल व्यापारी अश्या रुढींचे एवढ्या खोलात जाऊन पालन करतात असं वाटत नाही. मात्र काही हिंदू घरांमध्ये आजही लक्ष्मी पूजन करतात तसेच नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक केली जाते