Diwali Muhurat Trading : दरवर्षी दिवाळी म्हटलं कि भारतीय बाजारात होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंग बद्दल आपण आत्तापर्यंत बरीच माहिती जाणून घेतलेली आहे. मुहूर्त ट्रेडिंग का करतात, याचे फायदे कोणते अश्या अनेक गोष्टींबद्दल आता तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली असेल. व्यापारी समुदायाच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मुहूर्त ट्रेडिंग फारच महत्वाचे आहे हे आत्तापर्यंत तुमच्या लक्ष्यात आलेच असेल. म्हणून आता जाणून घेऊया नेमक्या कोणत्या कंपन्या या ट्रेडिंगचा भाग असतात. आणि कोणकोणते शेअर्स खरेदी करणं तुमच्या फायद्याचे ठरेल, याबाबत….
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सहभाग कोणाचा? (Diwali Muhurat Trading )
जसं कि आपल्याला माहितीच आहे कि मुहूर्त ट्रेडिंगला बाजरी दुनियेत भरपूर महत्वाचं शान प्राप्त आहे आणि या दिवशी केवळ अल्प काळासाठी सुरु होणाऱ्या या बाजारात अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. मुहूर्त ट्रेडिंग व्यापाऱ्यांच्या मनात पुढील आर्थिक वर्षात जोमाने व्यवसाय करण्याचा विश्वास निर्माण करायला मदत करते, त्यामुळे व्यापार मोठा असो वा छोटा यात अनेक नावं पाहायला मिळतात.
१. टाटा स्टील: टाटा कंपनी हि आपल्या देशातील एक सर्वपरिचित आणि श्रीमंत कंपनी आहे, आणि हि दिग्गज कंपनी या मुहूर्त ट्रेडिंगचा एक महत्वाचा भाग आहे. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपेक्षा पुढे जाण्याची क्षमता आहे, आणि कंपनीने आपली टार्गेट प्राइस 120 रुपये निश्चित केली आहे.
२. IRCTC: म्हणजेच Indian Railway Catering and Tourism Corporation. हि कंपनी देखील यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंग मधली महत्वाची कंपनी ठरणार आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 28 टक्क्यांपेक्षा पुढे जाण्याची क्षमता आहे आणि त्यांनी आपली टार्गेट प्राइस 950 रुपये अशी निश्चित केली आहे.
३. फेडरल बँक: मुहूर्त ट्रेडिंग मधलं अजून एक महत्वाचं नाव म्हणजे फेडरल बँक, एक्सिस सिक्युरिटीजने या बँकचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या बनकच्या शेअर्समध्ये 24 टक्क्यांपेक्षा पुढे जाण्याची क्षमता आहे आणि त्यांनी आपली टार्गेट प्राइस 1250 अशी दिली आहे.
मुहूर्त ट्रेडिंगमधून (Diwali Muhurt Trading) समोर आलेली हि काही महत्वाची नावं असली तरीही इतर अजून कंपन्या यात भाग घेणार आहेत. BSE आणि NSE कडून राबल्या जाणाऱ्या या मुहूर्त ट्रेडिंगचा (Diwali Muhurat Trading) काय निकाल येतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.