बिझनेसनामा ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी पिझ्झा कंपनी डॉमिनोजने (Domino’s Pizza) त्यांच्या ग्राहकांसाठी स्वस्तात पिझ्झा आणला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. टोमॅटोच्याच्या किमतीसह भाजीपाला आणि मसाल्यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. या महागाईचा परिणाम पूर्णपणे खाद्यपदार्थ किंवा फास्ट फुडवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरीही ग्राहकांच्या फेवरेट स्नॅक्स वर याचा परिणाम पडू नये म्हणून डॉमिनोजने स्वस्त पिझ्झा आणला आहे. डोमिनोज च्या या सर्वात स्वस्त पिझ्झाची किंमत फक्त 49 रुपये असून ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
49 रुपयांचा स्वस्तात मस्त पिझ्झा – (Domino’s Pizza)
डोमिनोज ही जगातील सर्वात मोठी पिझ्झा कंपनी असून भारतासह अमेरिकेमध्ये सुद्धा या डॉमिनोजचं मोठे मार्केट आहे. कंपनीने 49 रुपयांचा स्वस्तात मस्त पिझ्झा (Domino’s Pizza) आणल्याने ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या 49 रुपया वाल्या डॉमिनोज पिझ्झा ची साईज 7 इंच आहे. वाढत्या महागाईमुळे रेस्टॉरंट आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांवर सुद्धा याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहक कमी ऑर्डर देत आहेत. ‘आम्ही आमच्या ग्राहकांना स्वस्तात मस्त असा पिझ्झा उपलब्ध करून देऊ इच्छित आहोत. यासाठीच आम्ही 49 रुपयांमध्ये ग्राहकांसाठी पिझ्झा आणला आहे.’ असं डोमिनोजचे सीईओ यांनी सांगितलं.
मार्केट मध्ये टिकून राहण्यासाठी निर्णय?-
रायटर्स वृत्तसंस्था यांच्या म्हणण्यानुसार डॉमिनोज (Domino’s Pizza) पिझ्झा हट आणि बर्गर किंग यासारख्या फास्ट फूड ब्रँड असलेल्या कंपन्या मार्केट मध्ये टिकून राहण्यासाठी हे करत आहे. त्याचबरोबर भारतीय मार्केटमध्ये टिकून राहणे हे आव्हानापेक्षा कमी नाही. जुबीलंट फुडवर्स देशात 1816 डॉमिनोज आउटलेट चालवतात. ते म्हणाले की दर सोमवारी सर्वात अगोदर आर्थिक व्यवस्थापन आणि महागाईला हरवण्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली जाते.
पिझ्झा हटने देखील मागच्या वर्षी 79 रुपयांपासून पिझ्झा लॉन्च केला होता. त्यावेळी पिझ्झा हट इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले होते की, पिझ्झा हटला ग्राहकांसाठी असे फूड्स बनवायचे आहे ज्याचा फायदा ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत मिळू शकेल. डॉमिनोज प्रमाणेच मॅकडॉनल्ड्सने जून मध्ये अर्ध्या किमतीमध्ये जेवण लॉन्च केले होते.