Interview च्या वेळी ‘या’ चुका करू नका; अन्यथा नोकरीची संधी जाऊ शकते

बिझनेसनामा ऑनलाईन । मित्रानो सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढलं आहे. नोकऱ्या आहेत, पण त्यामध्ये खूप मोठी स्पर्धा आणि चुरस आहे. त्यामुळे कोणतीही नोकरी मिळवताना तुम्ही मार्क्स किती कमावले जितके महत्त्वाचे असते तेवढच महत्वाचे असत ते म्हणजे तुमच्यात स्किल किती आहे . जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता तेव्हा सर्वप्रथम तुमचा इंटरव्हिव्ह म्हणजेच मुलाखत घेतली जाते. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीच्या अंगात किती स्किल आहे हे त्याच्या मुलाखतींतून स्पष्ट होते. त्यामुळे मुलाखत हि नोकरी मिळवण्याची महत्त्वाची पायरी असते असं म्हंटल जाते.

मुलाखतीतून तुमचं वागणं, तुमचा स्वतःवरील विश्वास आणि तुम्ही एकमेकांशी संभाषण कस करू शकता किंवा तुमच्या मनातील आयडिया तुम्ही इतरांकडे कशा प्रकारे पोचवू शकता हे स्पष्ट होते. त्यामुळे मुलाखत चांगली दिली तर नोकरी हमखास मिळते परंतु मुलाखती मध्ये काही चुका झाल्यास तुमच्या नोकरीवर पाणी फिरण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलाखती दरम्यान टाळल्या पाहिजेत. चला सविस्तरपणे जाणून घेऊया….

1) वेळेवर न येणे-

मित्रानो, आयुष्यात वेळेला किंमत आहे. तुम्ही जर इंटरव्हिव्ह साठी उशिरा पोचला तर तुमच्याबद्दल इतरांच्या मनात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी इंटरव्हिव्ह ला जाताना वेळेवर जा किंवा काही काळ आधीच त्याठिकाणी दाखल व्हा.

2) खूप बोलणे –

मुलाखत सुरु असताना नेहमी स्वत:बद्दल बोलणे हीदेखील मोठी चूक ठरू शकते. अनेकदा काहीजण मुद्दाम स्वतःबद्दल इतकं काही फुशारकीने सांगत बसतात कि समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्या बद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे जास्त मोठं मोठं बोलू नका.

3) तयारी न करताच इंटरव्हिव्ह ला जाणे –

कोणताही इंटरव्हिव्ह असला तरी त्यापूर्वी त्याची तयारी करायला हवी. अभ्यास न करता किंवा ज्ञान न घेतला मुलाखतीला सामोरे गेल्यास मोठी गडबड होण्य्ची शक्यता आहे. आणि त्यामुळे तुम्ही नोकरीची संधीही सुद्धा गमावू शकता.

4) खूप कमी बोलणे –

जस कि खूप जास्त बोलल्याने तुम्ही फुशारक्या मारताय असा संदेश जाऊ शकतो त्याचप्रमाणे जर तुम्ही मुलाखतीच्या वेळी खूपच कमी बोलला तर याचा अर्थ तुमच्या स्वतःमध्येच आत्मविश्वास नाही असा समज जातो. त्यामुळे खूप कमी सुद्धा बोलू नका. तुम्ही जे काही बोलाल ते रोखठोक आणि आत्मविश्वासाने बोला. अशाने समोरच्या व्यक्तीवर तुम्ही चांगली छाप पाडू शकता.