1 महिन्यात पैसा डबल; ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट फायदा

बिझनेसनामा ऑनलाईन । मित्रानो, सध्याच्या घडीला पैसे कमवण्यासाठी अनेकजण शेअर मार्केटकडे आपली पसंती दाखवत आहेत. शेअर बाजाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर सखोल ज्ञान तर हवेच याशिवाय सध्याच्या जगात नेमकं काय चाललंय, बाजारातील नेमक्या घडामोडी काय सुरु आहेत यावर सुद्धा आपलं लक्ष असायला हवं. भारतीय शेअर मार्केट बाबत सांगायचं झाल्यास, गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट सुसाट चाललं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मध्ये तेजी पाहायला मिळत असून असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अवघ्या महिनाभरात दुप्पट पैसे मिळवत आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. त्यामुळे हे तेजीत असलेले स्टॉक कोणते आहेत याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत आणि यामुळे तुम्ही सुद्धा अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा करून घेऊ शकता.

1) Hemadri Cements-

हेमाद्री सिमेंटच्या शेअरची किंमत १ महिन्यापूर्वी 11.26 रुपये होती. परंतु सध्याच्या मार्केट मध्ये या शेअरचा दर 28.35 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच गेल्या महिनाभरात हेमाद्री सिमेंटच्या स्टॉकने सुमारे 151.78% इतका जबरदस्त रिटर्न आपल्या गुंवतणूकदारांना दिला आहे.

2) Swarna Securitie-

स्वर्ण सिक्युरिटीचा शेअर महिन्यापूर्वी ६२.०९ रुपये होता. परंतु आत्ता या शेअरचा दर 150.61 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच स्वर्ण सिक्युरिटीच्या स्टॉकने 1 महिन्यात तब्बल 142.57% रिटर्न मिळवून दिला आहे.

3) Khandelwal Extractions Ltd-

खंडेलवाल एक्स्ट्रॅक्शन्स लि. चाशेअर महिन्यापूर्वी 26.80 रुपये होता. परंतु सध्या या शेअरचा दर 67.56 रुपयांवर गेला आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने 1 महिन्यात सुमारे 152.09% रिटर्न आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.

4) Avance Technologies –

अव्हान्स टेक्नॉलॉजीजचा शेअर्स महिन्यापूर्वी 0.63 रुपये होता. परंतु आत्ता या शेअरचा रेट 1.45 रुपये झाला आहे. म्हणजेच सुमारे १ महिन्यातच अव्हान्स टेक्नॉलॉजीजच्या शेअर ने 130.16% रिटर्न दिला आहे.

5) Naturite Agro-

नॅच्युराइट अॅग्रोचा शेअर १ महिन्यापूर्वी ६७.८५ रुपये होता. परंतु सध्याच्या मार्केटमध्ये या शेअरची किंमत 171.36 रुपयांवर गेली आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने 1 महिन्यात तब्बल 152.56% रिटर्न आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.