Dunzo Crisis: डंझो कंपनीने नुकतीच कर्मचारी कपात केल्यानंतर, आता त्यांनी कर्मचाऱ्यांना एका अंतर्गत मेलद्वारे आश्वासन दिले आहे की 30 मार्च 2024 पर्यंत थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरून देण्यात येईल. कंपनीने पुढे असेही म्हटले आहे की यापुढे कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोणताही विलंब होणार नाही. गेल्या वर्षभरात, डंझोने खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या होत्या. यामध्ये कर्मचाऱ्यांची सर्व खाती बदलणे, बेंगळुरू कार्यालय रिकामे करणे आणि बंद करणे यांचा समावेश होता. कंपनीने कर्मचाऱ्यांना खात्री दिली आहे की ते त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेतील.
कोण असेल फ्लिपकार्टचा नवीन मालक?(Dunzo Crisis)
Flipkart ही भारतातील सर्वात मोठी E-Commerce कंपनी आहे, जी सध्या डंझो या एका लोकप्रिय क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म(quick Delivery Platform) खरेदी करण्यास उत्सुक आहे. यापूर्वी टाटा आणि झोमॅटो(Zomato) यांसारख्या कंपन्यांनीही डंझो खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु Flipkart सध्या आघाडीवर आहे.
मात्र लक्ष्यात घ्या की डंझोच्या मालकी हक्कांमुळे करार अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज, डंझोमधील 26 टक्क्यांची हिस्सेदारी असून कंपनीसमोर असलेल्या संकटांमुळे अद्याप कोणीही कराराला मान्यता दिलेली नाही. रिलायन्सने 2022 मध्ये 200 दशलक्ष डॉलरमध्ये ही हिस्सेदारी खरेदी केली होती. Flipkart आणि डंझो यांच्यातील चर्चा अजूनही सुरू आहेत(Dunzo Crisis) आणि लवकरच या प्रकरणातील निर्णय येण्याची शक्यता आहे, जर हा करार यशस्वी झाला तर फ्लिपकार्टला भारतातील क्विक डिलिव्हरी बाजारपेठेत मजबूत स्थान मिळेल.