बिझनेसनामा । “सौंदर्य आणि स्किनकेअरसाठी सर्वोत्तम डील कुठे मिळतील? पुरुष आणि महिला या दोघांच्याही जीवनातील या प्रमुख प्रश्नाचे उत्तर एकच आहे ते म्हणजे Nykaa… 2012 मध्ये ई-कॉमर्स कंपनी म्हणून सुरू झालेल्या या ब्रँडने अनेक सीमा तोडत नवीन उंची गाठली आहे. फक्त मल्टी-बॉडी केअर आणि सौंदर्य उत्पादने विकणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसहीत सुरू झालेल्या Nykaa चे आता भारतातील महानगरांमध्ये अनेक रिटेल स्टोअर्स आहेत. आता ग्राहकांना खिशाला परवडणारी आणि लक्झरी सारखी अनेक उत्पादने एकाच छताखाली मिळेल. तर आज आपण Nykaa च्या फाल्गुनी नायर यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.
Nykaa ची स्थापना
पदवी मिळवल्यानंतर फाल्गुनी नायर यांनी लगेचच कोटक महिंद्रामध्ये इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. IIM अहमदाबादची एमबीए पदवीधर असलेल्या फाल्गुनी यांना 2005 मध्ये त्याच बँकेचे एमडीही बनवण्यात आले. मात्र बँकिंग क्षेत्रातील स्थिर कारकीर्द सोडून फाल्गुनी नायर यांनी 18 वर्षांनंतर दुसरे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील लोकांच्या विश्वास ठेवण्याबद्दलची भीती आणि शंकेचा वापर करत ऑनलाइन सौंदर्याच्या तत्कालीन दुर्लक्षित क्षेत्रामध्ये उडी घेतली. चांगल्या भारतीय महिलांसोबत काम करण्याच्या आशेने या सौंदर्यप्रेमीने 2012 मध्ये Nykaa ची स्थापना केली. यावेळी त्यांनी महिलांच्या पर्सनल ग्रूमिंगला टार्गेट केले कारण आपला देश यामध्ये इतर देशांपेक्षा खूप मागे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सुरुवातीला Nykaa हे फक्त महिलांसाठीचे पर्सनल ग्रूमिंग प्रॉडक्ट्सची विक्री करणारे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म होते, मात्र आता त्यांनी रिटेल आणि पुरुषांच्या पर्सनल ग्रूमिंग कॅटेगिरीमध्येही सुरुवात केली आहे. अशा प्रकारे भारतीय सौंदर्य क्षेत्रातील फरक कमी करण्यासाठी फाल्गुनी यांनी आपले पती संजय नायर यांच्यासोबत एका साहसी उपक्रमाला सुरुवात केली.
व्यवसायिक धोरण आणि वाढ
इतर मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या उलट Nykaa हे 150 हून जास्त ब्रँड्सचे सर्व प्रॉडक्ट्स आपल्या ग्राहकांना लिस्टिंग करण्यापूर्वी त्यांची खरेदी करते. याद्वारे कोणत्याही बनावट प्रॉडक्ट्सची विक्री होण्यापासून प्रतिबंधित केले जाते. तसेच याद्वारे सर्व प्रॉडक्ट्स एकाच छताखाली मिळण्यासही मदत होते. तसेच कोणताही थर्ड पार्टी विक्रेता नसल्यामुळे खराब सर्व्हिस मिळण्याची शक्यता देखील नाही. कारण प्रत्येक प्रॉडक्ट्स डुप्लिकेकेशन किंवा बनावट टाळण्यासाठी इथे गुणवत्ता तपासणी केली जाते.
हे लक्षात घ्या कि, Nykaa चे जवळपास 5 लाख ऍक्टिव्ह ग्राहक आहेत आणि ऍपवर सध्या 500 हून जास्त ऍक्टिव्ह ब्रँड्ससहीत संपूर्ण देशभरात त्याचे सुमारे 70 स्टोअर्स देखील आहेत. यामध्ये Steadview Capital, TPG Growth आणि Lighthouse funds सारख्या गुंतवणूकदारांनी देखील गुंतवणूक केली आहे. आता तर अनेक सेलिब्रेटी देखील Nykaa मध्ये गुंतवणूक करण्यासाठी रस दाखवत आहेत.
अशा प्रकारे Nykaa ने मिळवले यश
Nykaa च्या येण्याआधी महिलांना सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यासाठी प्रत्येक ब्रँडच्या अधिकृत साइटवरच जावे लागत असे. मात्र Nykaa ने बहुतेक उत्पादने एकाच साइटखाली ठेवून ते काम खूप सोपे केले आहे. मात्र असे करत असताना इतर चॅनेलमध्ये गुंतून न राहता Nykaa ने स्वतःच आपल्यासाठी मार्ग तयार केला. आता तर Nykaa कडून Nykaa Luxe नावाने 5 फिजिकल स्टोअर्स देखील सुरू करण्यात आले आहेत, ज्याद्वारे संपूर्ण भारतात लक्झरी मेकअपची विक्री केली जाते आहे. आता तर Nykaa कडून भविष्यात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि मजबूत पकड निर्माण करण्यासाठी अनेक पर्सनल ब्रॅण्ड्स अन नवीन कलेक्शन लाँच केले जाणार आहेत.