E-Pan Card मुळे वाचणार तुमचा वेळ; कसं मिळवाल? नियम व अटी काय आहेत?

E-Pan Card । आज जग पूर्णपणे डिजिटल झालं आहे. बँकची कामं म्हणा किंवा काही खरेदी असो सगळ्याच गोष्टी घर बसल्या करता येत आहेत. डिजिटल जगात वावरणं हि एकार्थी वेळेची बचत आहे, ज्यामुळे जगणं सोपं झालं आहे. महत्वाच्या गोष्टी जसं कि आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स हे देखील हातात घेऊन फिरायची गरज आता उरलेली नाही कारण डीजी लॉकरमध्ये हि कागदपत्रं सुरक्षित राहतात. तुम्हाला माहिती आहे का आता पेन कार्ड (E-Pan Card) सुद्धा डिजिटल पद्धतीने वापरणं शक्य झालं आहे, कसं? जाणून घ्या…

E-Pan कार्ड गरजेचं का?

अनेक आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड हाताशी असणं महत्वाचं आहे. बँकेत खाते उघडणे, डी- मेट खाते उघडणे, म्युचल फंड, PPF PNP इत्यादी आर्थिक व्यवहाराशी निगडीत गोष्टी सांभाळण्यासाठी पॅन कार्ड अत्यावशक आहे. मात्र पॅन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर ते हातात मिळेपर्यंत भरपूर वेळ जातो आणि तोपर्यंत कामं अडकून राहतात. परंतु आता आलेल्या इंस्टन्ट पेन कार्डमुळे हि अडचण दूर झाली आहे कारण हे E-Pan Card सहज मिळवता येतं.

E- Pan Card कसं मिळवाल?

E-Pan Card मिळवण्याची प्रक्रिया साधी व सोपी आहे,

१) सगळ्यात आधी इन्कम टेक्स (Income Tax) खात्याच्या ई-फायलिंग वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं आणि या नंतर इंस्टन्ट पेन कार्डचा (E-Pan Card) पर्याय निवडावा.

२) इथे तुम्हाला गेट न्यू पॅन म्हणजेच नवीन पॅन कार्ड मिळवा असा पर्याय दिसेल तो निवडून आपल्या आधार कार्डची माहिती द्यावी. तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो वापरून आपल्या आधार कार्डचे तपशील तपासून घ्यावेत.

३) या नंतरची पायरी म्हणजे पॅन कार्डसाठी अर्ज करणे. तो अर्ज नीट न चुकता भरावा. अर्ज पाठवल्यानंतर इन्कम टॅक्स खात्याकडून तुमच्या ई- मेलवर नवीन ई- पॅन कार्ड PDF च्या स्वरुपात पाठवलं जाईल. हि सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाते.

काय आहेत नियम व अटी

१)अर्ज करणाऱ्या माणसाकडे स्वतःचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे, तसेच ते आधार कार्ड इतर कोणत्याही पॅन कार्डशी जोडलेले असू नये.

२) आधार कार्ड मोबाईल नंबरशी जोडलेले असावे.

३) हा अर्ज अर्जदाराकडून पहिलाच असला पाहिजे.

पॅन कार्ड महत्वाचे का?

पॅन कार्डशिवाय आर्थिक व्यवहार करणे सोपं नाही. या देशात वावरणारा प्रत्येक देशवासी हा सरकारला कर देत असतो, त्या कराची नोंदणी व तपशील इन्कम टॅक्स खात्याकडून ठेवला जातो, यावेळी पॅन कार्डची मदत घेतली जाते. याशिवाय पॅन कार्डचे अनेक फायदे आहेत, उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्हाला जर का एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सरकारी नियमांप्रमाणे तुमच्याजवळ पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. व्यवसायासाठी लागणारा TRN नंबर पॅन कार्ड शिवाय मिळणं अशक्य आहे. शिवाय हा एक मान्यताप्राप्त ID प्रुफ देखील आहे.

इंस्टन्ट पॅन कार्डमध्ये तुम्हाला एक QR Code दिला जातो, का कोड स्कॅन केल्यानंतर कार्डधारकाचे सर्व तपशील आपल्याला मिळून जातात. हे पॅन कार्ड तुम्हाला NSDL किंवा UTITSL या वेबसाईट वर सहज मिळू शकते. शेवटी काय तर हे E-Pan Card मिळवणं सहज शक्य आहे, त्यामुळे ते मिळून आर्थिक व्यवहार सोपे करावेत.